
वरुड/दि.१० – शासकीय अधिकारी व कर्मचा:यांच्या कोरोना टेस्ट करा, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक धनंजय बोकडे यांनी केली आहे. यासंदर्भात धनंजय बोकडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे की, तालुक्यातील शासकीय कर्मचारी व अधिका:यांची कोरोना चाचनी दर २० दिवसाने करण्याची मानसिकता तालुका प्रशासनाची असावी. सध्या कोरोनाचा तांडव तालुक्यात सुरु असुन रुग्ण संख्या ५०० च्या वर पोहचली असुन नागरिक आजही मास्क अथवा फिजिकल अंतर ठेवण्यात अयशस्वी दिसत आहे. परिणामत: आज गल्लोगल्ली कोरोना रुग्ण आढळुन येत आहेत. गर्दी कळस गाठीत आहे. प्रशासन मात्र निस्तेज आहे. नव्याने रुजु झालेले तहसिलदार या संकटातून मार्ग काढणार काय? यावर सामान्य नागरिक नजरा लावुन बसले आहेत. फेरीवाले, दुकानदार सर्वच व्यावसायिक ज्यांचा रोज शेकडो नागरिकांसोबत संपर्क येतो त्यांच्या कोरोना चाचणी सुरु कराव्या. अस मी ऐकल पण या चाचणी व जनजागृतीची सर्वप्रथम सुरुवात ही शासकीय कर्मचारी, अधिकारी व कार्यालयातुन व्हायला पाहिजे. पण जे घडल व घडत आहे ते चुकीच आहे. हे सुद्धा एक युद्ध आहे पण सिमेवरच्या युद्धासारखे युद्ध नाही. या युद्धात आपण आपला बचाव करु शकतो हे आपल्या हाती आहे. कोरोनाची चाचणी केली की पॉझिटिव्हच काढते. मुद्दाम पॉझिटिव्ह काढते, शासनाचा दीड लाख मिळते म्हणुन पॉझिटिव्ह दाखवतात. असे बरेच गैरसमज पसवणारे संदेश सोशियल मिडियावर फिरले. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज तयार झाले.
नगरपालिका कार्यालयात रोज शेकडो नागरिक येत असतात. गर्दी असते. अशात आजवर नगरपालिका अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी यांनी कितीवेळा कोरोना चाचणी करुन घेतल्या आहे? तहसिलमध्ये मागे काही कर्मचारी संक्रमित आढळून आले त्या तहसील कार्यालयातील किती कर्मचारी व अधिका:यांनी कोरोना चाचणी करुन घेतली? एक पोलिस कर्मचारी कोरोना विरुद्ध संघर्ष करत मृत्यूमुखी पडला. त्यानंतर सुद्धा पोलिस स्टेशनच्या किती कर्मचा:यांनी कोरोना चाचणी करुन घेतल्या? पंचायत समिती असो, बांधकाम विभाग असो, खासगी हॉस्पिटल, सरकारी दवाखाने असो सर्वच शासकीय कर्मचारी व अधिकारी वर्गाने आपली जबाबदारी प्रथम हे ब्रीद वाक्य समजुन स्वत: पासुन सुरुवात केली पाहिजे. आपोआपच जनजागृती होईल प्रत्येक व्यक्ती कोरोना चाचनी करुन घ्यायला तयार होईल तोही स्वखुशीने. जीव गरीबाचा असो की श्रीमंताचा. सामान्य जनतेचा असो की अधिकारी व कर्मचा:यांचा किंवा कार्यकत्र्यांचा असो की नेत्याचा तो सारखाच मौल्यवान आहे. आपण सर्व महामारीत झुंडाने, नाहक मरायला जन्माला आलो नाही. अजूनही वेळ गेली नाही एकमेकांचा विचार करा. स्वत:ही जगा आणि दुस:याला ही जगवा जास्तीतजास्त कोरोना चाचणी करा आणि आरोग्य विभागाने दिलेले सुचनेचे काटेकोरपणे पालन करा, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक धनंजय बोकडे यांनी केली आहे.