मराठी

ठाकरेंची लोकप्रियता अजूनही कायम सर्वोच्च मुख्यमंत्र्यांत पाचवे

बिगर भाजप मुख्यमंत्रीच उजवे

मुंबई दि . ८ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काम करत नाहीत, असे विरोधकांकडून सातत्याने आरोप होत आहे; मात्र लोकांनी ठाकरे सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्थान पटकावले आहेत. या यादीत ते पाचव्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, गेल्या तीन सर्वेक्षणात सलग पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या वेळी चौथ्या क्रमांकावर घसरल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सलग तिसर्यादा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत. ‘इंडिया टुडे ग्रुप‘ आणि ‘कार्वी इनसाइट्स‘ने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन २०२०‘ सर्वेक्षणात आदित्यनाथ यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. आदित्यनाथ यांना २४ टक्के मते मिळाली आहेत. गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत ही मते सहा टक्क्यांनी वाढली आहेत. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीवरुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असतानाही योगींच्या कारभारावर लोक समाधानी आहेत, हेच यातून स्पष्ट झाले. सर्वेक्षणानुसार, पहिल्या पाचपैकी मुख्यमंत्र्यांमध्ये ठाकरे यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. बॅनर्जी यांना नऊ टक्के मते मिळाली आहेत, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १५ टक्के मते मिळाली असून ते दुसर्या आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ११ टक्के मतांसोबत तिसर्या क्रमांकावर आहेत. एकूण १२,०२१ मुलाखती घेण्यात आल्या. ग्रामीण भागातील ६७ टक्के आणि शहरी भागात ३३ टक्के मुलाखतीच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आले. देशातील ९७ संसदीय मतदारसंघ आणि राज्यांमधील १९४ विधानसभा मतदार संघात हे सर्वेक्षण करण्यात आले. पहिल्या पाच क्रमांकात बिगर भाजप आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

१ पहिले पाच मुख्यमंत्री

योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश)

अरविंद केजरीवाल (दिल्ली)

जगन रेड्डी (आंध्र प्रेदश)

ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल)

उद्धव ठाकरे (महाराष्ट्र)

 

२ इतर आठ मुख्यमंत्री व त्यांना मिळालेली मते

नितीशकुमार (बिहार) ( ७ टक्के)

एन पटनायक (ओडिशा) ( ६ टक्के)

के चंद्रशेखर राव (तेलंगणा) ( ३ टक्के)

अशोक गहलोत (राजस्थान) ( २ टक्के)

बीएस येदियुरप्पा ( कर्नाटक) ( २ टक्के)

भूपेश बघेल (छत्तीसगड) ( २ टक्के)

शिवराज चौहान (मध्य प्रदेश (२ टक्के)

विजय रुपाणी (गुजरात) (२ टक्के)

Back to top button