मराठी

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या सक्रिय भूमिकेमुळे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वी होईल

एड. यशोमती ठाकूर यांचा विश्वास

मुंबई, दि 18 : कोरोनामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हाती घेण्यात आलेली ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सक्रीय सहभागाने यशस्वी होईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारीतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेतील  सहभागाबाबत आज मंत्री एड. ठाकूर यांनी ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, सर्व जिल्ह्यातील उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

यावेळी एड. ठाकूर यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही यंत्रणा राज्यातील घराघरात पोहोचलेली आहे. प्रत्येक कुटुंबाशी अंगणवाडी ताईचा संपर्क असतो. त्यामुळे तुमच्या सक्रीय सहभागाने, सहकार्याने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम प्रभावीपणे घराघरात पोहोचेल. याआधी प्रत्येक उपक्रमात आपण भरीव कामगिरी केली आहे, आताही कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी तुमचा सहभाग मोलाचा आहे.

Back to top button