मराठी

नदीपात्रात सापडला अज्ञात इसमाचा मृतदेह

हातुर्णा नजीकच्या वर्धा नदीपात्रातील घटना

वरुड/दि.२७ – बेनोडा (शहीद) पोलीस स्टेशन अंर्तगत येत असलेल्या तालुक्यातील हातुर्णा येथील वर्धा नदी पात्रात एका वृद्ध ईसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलीस पाटील यांनी दिल्यावरून बेनोडा (शहीद) पोलीसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद करून पुढील तपास सुरु आहे.
प्राप्त माहीतीनुसार, (ता.२६) ला दुपारी ४ वाजताचे सुमारास एका अनोळखी वृध्द इसमाचा मृतदेह हातुर्णा येथील वर्धा नदी पात्रातील झाडांच्या झुडपात पाण्यामध्ये आढळुन आल्याची माहिती हातुर्णा येथील पोलीस पाटील प्रकाश गोहत्रे यांनी दिल्यावरून बेनोडा (शहीद) पोलीसांनी घटनास्थळ गाठुन तो मृतदेह पाण्याबाहेर काढला असता त्या ईसमाचे वय अंदाजे ६२ वर्ष, उंची ५ फुट ६ इंच, अंगात फिक्कट आकाशी रंगाचे शर्ट ज्यावर बारीक चेक्स आहेत तसेच पायजामा घातलेला डोक्याचे केस काळे पांढरे सोबत पिशवी ज्यामध्ये एक पांढरा पायजामा, कथिया रंगाची शाल व पांढरे रंगाचे शर्ट ठेवले असल्याचे दिसुन आले. या ईसामाचा ५ ते ६ दिवसांपुर्वी पाण्यात पडुन मृत्यु झाल्याने तो मृतदेह पुर्णत: कुजलेला होता. रात्र झाल्याने आज सकाळचे सुमारास वैद्यकिय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचुन त्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. नंतर त्याच ठीकाणी पोलीसांनी त्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले. या घटनेची फिर्याद हातुर्णा येथील पोलीस पाटील प्रकाश मारोतराव गोहत्रे (५०) यांनी दिल्यावरून बेनोडा (शहीद) पोलीसांनी कलम १७४ अन्वये आकस्मिक मृत्युची नोंद करुन पुढील तपास बेनोडा
(शहीद) पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हे.कॉ.सुभाष शिरभाते, शशिकांत पोहरे, पो.कॉ.विवेक घोरमाडे आदी करीत आहे. सदर इसमाची ओळख पटल्यास नागरिकांनी याबाबत पोलीसांना माहीती देण्याचे आवाहन बेनोडा (शहीद) पोलीसांनी केले आहे

Back to top button