मराठी

नागपुरातील सदर भागात इमारत कोसळली

एकाचा मृत्यू, चार जण जखमी

नागपुर/दि.२४– नागपुरातील सदर भागात आझाद चौकातील एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. सोमवारी (दि. 24) पहाटे ही दुर्घटना घडली आहे.
अशोक हिरालाल टेकसुलतान यांच्या मालकीची ही इमारत होती. पहाटे पावणेपाच वाजता ही इमारत कोसळली. अग्निशमन दलाच्या टीमने तत्काळ जाऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. त्यांनी प्रभा टेकसुलतान (वय 55), लक्ष्मी टेकसुलतान (वय 65), लोकेश टेकसुलतान (वय 22) व राकेश सीरोहिया (वय 32) या चार जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढले. हे चौघेही जण जखमी झाले आहेत. तर या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. किशोर टेकसुलतान (वय 43) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, मेयो हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Back to top button