मराठी

आरोग्य यंत्रणेची बेफिकिरी

940 जणांच्या नावापुढे एकच क्रमांक

ग्वाल्हेर/दि.९ – कोरोनाची लस आली असेल; परंतु सरकारी यंत्रणेचा संसर्ग संपलेला नाही. सोमवारी मध्य प्रदेशात आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळपणाचेएक मोठे प्रकरण समोर आले. लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात ग्वाल्हेरमधील एका केंद्रावर सोमवारी 940 फ्रंटलाइनवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार होती; परंतु त्यांच्या सर्वांच्या नावांसमोर एकच मोबाइल नंबर (9977461031) लिहिला होता. परिणामी संबंधित कर्मचार्‍यांना कोणताही संदेश प्राप्त झाला नाही किंवा पडताळणी झाली नाही. या केंद्राच्या बूथवर एकही फ्रंटलाईन कामगार लसीकरणासाठी उपस्थित नव्हता. फक्त दहा लोक तिथेपोहोचले होते; परंतु त्यांचा क्रमांक रेकॉर्डमध्ये न मिळाल्यामुळेपडताळणी करून लसीकरण करता आलेनाही.
लसीकरणात सामील झालेल्या सर्वांच्या नावासमोर समान मोबाईल क्रमांक लिहिलेला आहे. जेएएच रुग्णालयात पोहोचलेल्या पालिका कर्मचार्‍यांच्या यादीतील सर्वनावांपुढचा क्रमांक (9977461031) हा महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या राजेश सक्सेना यांचा आहे. त्यांच्याशी चर्चाकेली असता ते म्हणालेकी, हा नंबर सर्वांच्या नावापुढं कसा लिहिला गेला, हे मला माहीत नाही. सोमवारी दुपारी जेएएचकडून मला कॉल आला. डॉक्टर म्हणाले, की प्रत्येकाच्या नावापुढे तुमचा नंबर आहे. सक्सेना म्हणतात, की प्रत्येकाच्या नावासमोर आपला नंबर कसा लिहिला गेला हेमाहीत नाही, तर ज्यांना ही लस मिळते, त्यांच्या यादीमध्ये माझा समावेश नाही. लसीकरण अधिकारी डॉ. आर. के. गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की ही यादी यादी भोपाळहून कोणीतरी पाठविली असावी. दुर्लक्ष झाले आहे; पण आता कोणत्या स्तरावर चूक झाली, हे पाहावे लागेल. त्याचा तपास केला जात आहे. आत्ताची प्राथमिकता त्वरित नवीन यादी तयार करण्याला आहे.

 

Related Articles

Back to top button