मराठी

सात अब्ज लोकांपर्यंत लस पोचविण्याचे आव्हान

नवी दिल्ली दि १कोरोनावर मात करण्यासाठी लसी विकसित करण्याचा अंतिम टप्पा असला, तरी या लसी सात अब्ज नागरिकांपर्यंत पोचविण्याचे मोठे आव्हान आहे. जंबो जेटच्या आठ हजार फेर्‍या कराव्या लागतील, असे दिसते.
कोरोनाविरोधात लस आता लवकरच बाजारात येईल. ती नागरिकांपर्यंत कशी पोचवायची, हे जगासमोर आव्हान आहे. लसी जगातील सात अब्ज लोकसंख्येपर्यंत पोहोचणे सोपे नाही. 110 टन क्षमतेच्या जंबो जेट्सच्या 8000 फेर्‍यांची आवश्यकता असेल. हे अभियान दोन वर्षे चालवावे लागेल. या लसीच्या वितरणास केवळ विमानेच लागणार नाहीत, तर त्यास कार, बस, ट्रक तसेच मोटारसायकली व सायकलींचीही गरज भासणार आहे. काही भागात ही लस पायी पोहोच करावी लागेल.
इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने (आयएटीए) सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे, की 110-टन बोईंग 747 विमानाने आठ हजार फेर्या कराव्या लागतील, त्यानंतर ही लस सर्वांपर्यंत पोहोचेल. याशिवाय तापमान नियंत्रण व इतर आवश्यकतांकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल. विशेषत: फायझरची लस अगोर ब्रिटन, अमेरिका तसेच युरोपीय संघातील इतर देशांमध्ये वितरित करण्यात येईल. सुरक्षित आणि प्रभावी होण्यासाठी हे उणे 60-70 अंश सेल्सियस तपमानावर ठेवणे आवश्यक आहे. आयएटीएचे प्रमुख अलेक्झांड्रे डी जुनिआक म्हणतात, की जगातील सर्वांंत मोठी आणि सर्वांत जटिल लॉजिस्टिक कसरत आहे. आता संपूर्ण जगाची नजर आमच्यावर आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जगातील सर्वांत मोठया मालवाहूवाहक असलेल्या लुफ्तान्साने एप्रिलमध्येच लस वितरण योजनेवर काम सुरू केले. 20 लोकांचे कार्य बल तयार करण्यात आले आहेत. मॉडर्ना, फायझर किंवा अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या लसींना जगातील प्रत्येक कोपर्‍यात स्थानांतरित करता येईल. टास्क फोर्सकडे एअरलाइन्सच्या 15 बोईंग 777 आणि एमडी -11 कार्गो जहाजांमध्ये जागा कशी तयार करावी याबद्दल प्रश्‍न होते. 25 टक्के क्षमतेसह उड्डाण करणार्‍या प्रवासी विमानांच्या ताफ्यात बदल केला जाईल. लुफ्तान्साच्या टास्क फोर्सचे प्रमुख थॉर्टन ब्रोन म्हणतात, की आमच्यासमोर प्रश्‍न आहे, की क्षमता कशी वाढवायची? जागतिक आरोग्य संघटनेच्या च्या लसीकरणाच्या प्रमुख कॅथरिन ओ ब्रायन यांनी सांगितले, की एव्हरेस्ट चढण्यापेक्षा ही लस देणे अधिक अवघड आहे. अनेक महिने परिश्रम करून लस बनवणे म्हणजे फक्त एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत पोहोचणे.

Related Articles

Back to top button