मराठी

काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाहीत

- अशोक चव्हाण

परभणी/दि.३१ – महाविकास आघाडीमध्ये काहीही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत असते. तिन्ही पक्षांमध्ये काहीच ताळमेळ नसल्याच्या चर्चा नेहमीच केल्या जात असतात. आज पुन्हा एकदा हा मुद्दा समोर आला आहे. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नसल्याचा गंभीर आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला. यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.
चव्हाण म्हणाले, की काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी दिला जात नाही. याच कारणामुळे नांदेडलाही निधी मिळालेला नाही; मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचा आढावा चव्हाण यांनी घेतला. ते म्हणाले, की आपण सत्तेत असतो, तेव्हा आपल्या भागाचा विकास व्हायला हवा या मताचा मी आहे; मात्र दुर्देवाने कोरोनामुळे 30 टक्के निधी मिळाला. मराठवाड्यात जास्तीत जास्त निधी देण्याची माझी भूमिका आहे. चव्हाण यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्याविषयीही भाष्य केले आहे. ते म्हणाले, की विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते; मात्र राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकास आघाडी प्रत्यक्षात आली आहे.

Related Articles

Back to top button