महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना योध्दांच्या कामाची दखल
किशोर तिवारी यांनी वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन कोरोना योध्दांचा केला सत्कार
यवतमाळ प्रतिनिधी :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhavji Thackeray) यांनी कै. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर तसेच कर्मचा-यांच्या कामाची दखल घेतली आहे. अनेक डॉक्टर ,आरोग्य सेविका ,सफाई कर्मचाऱ्यांनी मागील चार महीन्यात एकही रजा न घेऊन आपल्या प्राणाची पर्वा न करता सतत सेवा दिली आहे. त्यामुळे अशा कर्मचा-यांची माहितीमिळताच मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या सुचनेनुसार वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनीवैदयकीय महाविदयालयात जाऊन डॉक्टर, कर्मचा-यांचा सत्कार केला.
यवतमाळच्या कोरोना आयसोलेशन वार्डात अनेक डॉक्टर, कर्मचारी रजा न घेता सेवा देत असल्याची माहिती किशोर तिवारी यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना दिली. अत्यंत कौतुकास्पद कार्य असल्यामुळे उध्दवजी ठाकरे यांनी किशोर तिवारी यांनाअशा सर्व कर्मचा-यांचे मनोधैर्य वाढविण्याचे तसेच त्यांचा सत्कार करण्याच्या सुचना दिल्या.
त्या अनुषंगाने किशोर तिवारी यांनी वैदयकीय महाविद्यालयात जाऊन डॉक्टर तसेच कर्मचा-यांचा सत्कार केला. यामध्ये सौ छाया गौरी -इन्चार्ज सिस्टर आयसोलेशन ,नरेंद्र ब्राह्मणे -सफाई कामगार, ऋषभ पवार-सफाई कामगार, रजनी चपारिया- सफाई कामगार,
डॉ.राजेश प्रताप सिंह (अधिष्ठाता) डॉ. रवींद्र राठोड (वैद्यकीय अधीक्षक) डॉ.शेखर घोडेस्वार -सहयोगी प्राध्यापक औषधशास्त्र विभाग, डॉक्टर चंद्रशेखर धुर्वे-सहाय्यक प्राध्यापक औषध शास्त्र विभाग, डॉ. अरविंद कुडमेथे (वैद्यकीय अधिकारी, प्रमुख, अपघात विभाग) डॉ.चेतन जनबादे(निवासी वैद्यकीय अधिकारी), डॉ. अरयेशा शेख (साहयक प्राध्यापक ),डॉ. विशाल धवणे(अपघात वैद्यकीय अधिकारी), डॉ. गोविंद शिंदे (रेसिडेंट मेडिसीन विभाग) यांच्या ऐतिहासिक कामाची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कोरोना योध्दांच्या अमूल्य योगदानामुळे शेकडो कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचले असल्याने किशोर तिवारी तसेच सौ. स्मिता तिवारी यांनी वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन कोरोना योध्दांचा सत्कार केला. मागील 4 महिन्यापासून कोरोनाची
लागण झालेल्या रुग्णांची पूर्णवेळ सेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार यांचे किशोर तिवारी यांनी शासनाच्या वतीने आभार मानले. याप्रसंगी किशोर तिवारी म्हणालेज्या कोरोना योध्दांचा मी आज सत्कार केला त्यामध्ये माझे आदीवासी , अनुसुचित व भटक्या जमातीचे अत्यंत कठीण परीस्थितीतुन समोर आलेल्या डॉक्टर, कर्मचा-यांचा समावेश आहे. ते स्वताच कठीन परीस्थितीतुन आल्यामुळे त्यांना गरीबीची आणि अडचणीच्या परीस्थितीची जान आहे. त्यामुळे त्यांचे हे योगदान विसरु शकनार नाही. काही मुठभर राजकारणी मात्र अशाही परीस्थितीत त्यांना दोष देण्याचा प्रयत्न करतात हे क्लेशदायक आहे. भय निर्माण झाले असल्यामुळे कोरोनाग्रस्तांची मानसिक स्थिती पाहून सर्वानी संयम व विनम्रता न सोडण्याचे आवाहन सुध्दा किशोर तिवारी यांनी केले.