मराठी

आईच्या डोळ्यादेखत मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

तिवसा तालुक्यातील शिरजगाव येथील घटना

तिवसा/दि.१५ – मुलगा विहिरीत तळफडत होता;आई त्याला वाचवण्यासाठी आकांत करत होती.पण नियतीनं डाव साधला.१५ ऑक्टोबर ला आपल्या आईसोबत शेतात गेलेला मुलगा न्याहारी करण्याकरिता पाण्याची आवश्यकता भासणार म्हणून शेताशेजारीच लागून असणाऱ्या एका विहीरीवर दोन्ही मायलेक पाणी आणायला गेली असता आई पाणी विहिरीतून काढत असतांना विहिरीशेजारी उभा असलेला मुलगा अचानक विहिरीत पडला आणि स्वतःहा चा जीव वाचवण्यासाठी तळफडत होता. त्याची आई मुलाला वाचवण्यासाठी आकांत करत होती पण शेजारी कोणीही आवाजाला साद देणार नसल्याने नियतीन डाव साधला अन् जन्मदात्या मुलाचा आईच्या डोळ्यासमोरच दि.१५ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजताच्या दरम्यान विहरित बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी या गावात घडली करणं महादेव बेले वय २२ असे म्रुत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे…
करणं हा आज त्याची आई व दोन शेतमजूर महिला सॊबत घरच्या शेतात शेतकाम करायला गेला होता.दरम्यान शेतातील मजूरासाठी पाणी आणायला करणं आणि त्याची आई शेजारच्या एका शेतात गेले असताच विहिरीशेजारी उभा अडलेल्या करणचा तोल गेला व विहरित बुडून त्याचा मृत्यू झाला.तत्पूर्वी पाणी विहिरीतून पाणी काढत असलेल्या आईने मुलगा विहिरीत पडल्याचे दृश्य पाहताच आईला आपला मुलगा पाण्यात बुडत असल्याचे दिसताच तिने त्याला वाचवण्यासाठी जीवाचा आकांत केला. मात्र त्याला वाचवण्यात यश आले नाही अशातच करणं याचा मृत्यू झाला.दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसानी घटना स्थळी धाव घेत मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला असून मृत्यूदेह तिवसा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून तिवसा पोलीसांनी घटनेचा मर्ग दाखल केला आहे.जन्मदात्या आईच्या समोरच तरुण मुलांचा विहिरीत तडफडून मृत्यू झाल्याने गावात शोकाळ पसरली आहे.

शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना तीन तास वाट पाहावी लागली….

आज सकाळी  करणं चा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला याची माहिती तिवसा पोलीसांना मिळताच त्यांनी घटना स्थळी धाव घेत विहिरीतून मृत्यूदेह बाहेर काढला मात्र जेव्हा मृत्यूदेह तिवसा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला तेव्हा नातेवाईकांना मृत्यूदेह मिळण्यासाठी तीन तास तळ ठोकून वाट पाहावी लागली तीन तासा नंतर डॉक्टर आले व शवविच्छेदन झाले.तेव्हा यावेळी नातेवाईकांनी तिवसा ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले.

मुलाला होता मिरगीचा त्रास..

लहानपणापासून करणंला मिरगी या आजाराचा त्रास होता फिट आली की जमिनीवर करणं आदळून पडत होता आज शेतातील विहिर जवळ पाणी आणण्यासाठी आई व करणं गेला असता त्याला तिथेच मिरगी आली त्यामुळेच त्याचा तोल विहिरीत गेला व यातच करणंचा दुर्दैव मृत्यू झाला.

Related Articles

Back to top button