मराठी

राम मंदिराचे संकल्पचित्र राम मंदिर निर्माण ट्रस्टने तयार केले असून आज ते प्रसिद्धीस देण्यात आले.

प्रतिनिधि/दी.4
अयोध्येत शिवसेनेचा घुमला नारा
अयोध्याः अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या राम मंदिराच्या लढ्याचा गोड शेवट उद्या होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन होत आहे. अवघ्या काही तासांवर हे हा सोहळा येऊन ठेपला आहे. दरम्यान, आता अयोध्येत शिवसेनेचाही नारा घुमला आहे. मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष विक्रम प्रताप सिंग हे अयोध्येत दाखल झाले आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाची माती घेऊन विक्रम प्रताप सिंग अयोध्येत पोहोचले आहेत. यानंतर अयोध्येत शिवसेनेचा आवाज घुमला आहे. शरयू तीरावर ही माती ठेऊन त्यासमोर 492 दिवे लावणार आहेत. शिवसेना हा सोहळा कसा साजरा करणार असा प्रश्न होता. आता शिवसैनिकांच्या माध्यामातून या सोहळ्याला शिवसेनेने उपस्थिती लावली आहे. या वेळी मीरा भाईंदर महापालिका नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष विक्रम प्रताप सिंह यांनी राम मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपालदास महाराज यांची भेट घेतली आहे.

Back to top button