मराठी

डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय होणार कोरोना चाचणी

कोरोना चाचण्यांच्या धोरणात मोठा बदल

नवी दिल्ली दी ५- देशात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना संसर्गास आळा घालण्यासाठी, केंद्र सरकारने कोरोना चाचण्यांच्या धोरणात मोठा बदल केला आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय लोकांना यापूर्वी कोरोना चाचणी करून घेता येत नव्हती; मात्र आता जर कुणाला कोरोना चाचणी करून घ्यायची असेल, तर यासाठी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनची गरज लागणार नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना चाचणी संदर्भातील मार्गदर्शक सूचनांत काही बदल केले आहेत. त्यानुसार लोकांना ‘ऑन-डिमांड टेस्टिंग’ची सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे आता डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोरोना चाचणी करता येणार आहे. ज्यांना प्रवास करायचा आहे आणि त्यांना कोरोना चाचणी करून घ्यायची आहे, त्यांना ऑन-डिमांड कोरोना चाचणी करून घेता येईल. आतापर्यंत देशात जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आदेश, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन किंवा परिसरात प्रशासनाद्वारे करण्यात येणाऱ्या तपासण्या  व्यतिरिक्त कोणालाही  स्वतःच्या मर्जीने कोरोना चाचणी करता येत नव्हती; मात्र आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना चाचणीच्या नियमावलीत करण्यात आलेल्या या बदलानंतर आता कुणालाही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ऑन-डिमांड कोरोना चाचणी करून घेणे शक्य होणार आहे.
या निर्णयानंतर जर एखाद्या व्यक्तीत कोरोनाची लक्षणे आढळत असतील, तर त्याला हवे असेल तर कोरोना चाचणी करून घेऊ शकतो. याचबरोबर ज्यांनी मागील १४ दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे, त्यांच्यातील लक्षणे असणाऱ्या व्यतिरिक्तदेखील सर्व लोकांची चाचणी केली जाईल. एखाद्याला दुसऱ्या राज्याचा किंवा देशाचा प्रवास करायचा असेल, तर तोही कोरोना चाचणी करता येईल. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आरोग्य विभागाद्वारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि ट्रॅकिंगची मदत घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

Back to top button