पुणे २८ : कोविशिल्ड लस पूर्णपणे सुरक्षित आहे. सर्वसामान्यांना परवडलेल अशा किंमतीत डोस उपलब्ध करून देणार आहे. जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध करून देवू अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी दिली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन लसीच्या निर्मितीचा आढावा घेतला. यानंतर अदर पुनावाला यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली
आज पंतप्रधान मोदी आता पुण्यातील मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे येऊन कोविशिल्ड प्रकल्पाचा आढावा घेतला. पंतप्रधानांना लसीच्या उत्पादनाबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनेक महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा झाली. लसीच्या तयारीबद्दल पंतप्रधान समाधानी असल्याचे पुनावाला यांनी सांगितले.
लसीच्या तिसऱ्या चाचणीवर लक्ष आमचे लक्ष असून, जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध करणार आहे. लसीची साठवणूक आणि कोल्ड स्टोरेजचीही पुरेशी व्यवस्था आहे. सध्या लसीच्या तिसऱ्या ट्रायरलवर आमचे लक्ष असून, कोविशिल्ड लस पूर्णपणे सुरक्षित आहे. या लसीचे वितरण पहिला भारतात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोविशिल्ड लसीमुळे ६० टक्के लोकांना रूग्णालयात नेण्याची गरज पडणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.