मराठी

चालक बनून डॉक्टरने वाचविले कोरोनाग्रस्ताचे प्राण

पुण्यातील कात्रज भागातली घटना

पुणे/दि.२७ – पुण्यातील एका डॉक्टरने चालक बनून एका कोरोना रुग्णाचे प्राण वाचविले. डॉ. रणजीत निकम असे या डॉक्टरांचे नाव आहे. डॉ. निकम आणि त्यांच्या सहकारयाकडून पुण्यातील कात्रज भागात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर कोविड सेंटर चालवले जात आहे. या सेंटरमध्ये असलेल्या एका रुग्णाला सोमवारी रात्री दोन वाजता अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्या रुग्णाचे वयही जास्त असल्यामुळे त्याला तातडीने उपचारांची गरज होती. श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्या रुग्णाला कृत्रिम पद्धतीने ऑक्सिजन देणे आवश्यक होते.त्यामुळे रात्री काम करणारया कोरोना सेंटरमधील कर्मचारयानी त्या रुग्णाला तातडीने ऑक्सिजन बेडची सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये हलवायचे ठरवले. कोरोना सेंटरसाठी काम करणारा रुगणवाहिकेचा चालक थंडी आणि तापामुळे आजारी पडला. होता, तर दुसरा चालक घरी गेला होता.
कोरोना सेंटरमधील कर्मचारयानी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका मिळवण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. वेळ आणीबाणीची होती. कोरोना रुग्ण असलेल्या ७१ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला तातडीने उपचार मिळणे गरजेचं होते. रुग्णाच्या घरातील इतर व्यक्तीही कोरोना होकारात्मक असल्यामुळे विलगीकरणात होते. रुगणवाहिेकेची सोय करण्यासाठी कुणीही उपलब्ध नव्हते. त्यामुळे मागचा पुढचा विचार न करता त्या वेळी रुग्णांवर उपचार करत असलेल्या डॉ. निकम यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवायचे ठरवले.

Back to top button