वरुड/दि.९ – दारु पिवुन शिविगाळ करणा:या एका इसमाने विट मारुन फेकल्याने एक जखमी ाझाल्याची घटना शहरातील ब्राम्हणपुरी परिसरात घडली. याप्रकरणी वरुड पोलिसांनी एका विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, शहरातील देशमुख पुरा परिसरातील सचिन बारस्कर व ब्राम्हणपुरी परिसरातील किशोर श्रीराव हे दोघे एकमेकांचे ओळखीचे असून ६ जानेवारीला रात्री ९.३० च्या सुमारास सचिन आणि त्याचा मित्र संजय बबनराव केणे (४०) रा.देशमुखपुरा व वरुड हे दोघे किशोरच्या घरासमोरुन जात असतांना किशोर श्रीराव याने दारु पिवुन सचिन याला शिविगाळ केला असता सचिन याने शिविगाळ का करतो ? असे म्हटले, या कारणावरुन किशोर यांने विटेचा तुकडा घेवुन सचिनला मारुन फेकला. यामध्ये सचिनला गंभिर दुखापत झाली.
याप्रकरणी सचिन रामकिसन बारस्कर (३०) रा.देशमुखपुरा या फिर्यादीवरुन किशोर श्रीराव रा.ब्राम्हणपुरी वरुड याचे विरुध्द भादंवि ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास आयपीएस ठाणेदार श्रेणिक लोढा यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.