नवी दिल्लीी/दि.५ – चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) २३..९ टक्क्यांनी घटलेल्या सकल राष्ट्री उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर निराशेचे मळभ दाटून आले आहे. अशा परिस्थितीत एक आशेचा किरण दिसतो आहे. वित्त मंत्रालय भविष्याबद्दल आशावादी आहे. अर्थ मंत्रालयाचा असा दावा आहे, की अर्थव्यवस्था अनलॉक करण्याची प्रक्रिया जुलैपासून लागू झाली आणि आता अर्थव्यवस्था सुधारली आहे.
अहवालानुसार वाहन विक्री, ट्रॅक्टरची विक्री, खत विक्री, रेल्वे मालवाहतूक, स्टीलचा वापर आणि उत्पादन, सिमेंट उत्पादने, वीज वापर, ई-वे बिले, जीएसटी महसूल संकलन, महामार्गावरचे टोल संकलन किरकोळ स्तरावर आर्थिक व्यवहार वाढत आहेत. मंत्रालयाचे म्हणणे आहे, की उत्पादन पातळी गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टच्या आसपास पोहचेल किंवा त्यापेक्षा जास्त होईल. यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीत घसरण झालेल्या ऑटोमोबाईल विक्रीत ऑगस्ट महिन्यात वाढ नोंदली गेली. ऑगस्टमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ट्रॅक्टरची विक्रीही वाढली. मागील वर्षाच्या तुलनेत दुचाकींच्या विक्रीतही ७-८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाल्याने मागील वर्षाच्या तुलनेत मागील तीन महिन्यांपासून खतांचे उत्पादन वाढत आहे. यावर्षी मार्चमध्ये ५२ हजार ३६२ ट्रॅक्टर नोंदविण्यात आले होते, ते ऑगस्टमध्ये वाढून ६६ हजार ६१ झाले. वित्त मंत्रालयाच्या अहवालानुसार या वर्षी जुलै महिन्यात ९.५२ दशलक्ष टन वस्तूंची वाहतूक झाली. गेल्या वर्षी जुलैमध्ये ९. ९७ दशलक्ष टन मालाची वाहतूक झाली होती. ऑगस्टच्या पहिल्या २० दिवसांत ५६.६ दशलक्ष टन वस्तूंची वाहतूक झाली. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार यंदाच्या एप्रिलमध्ये ७९ लाख प्रवाशांनी आरक्षण रद्द केले.
जुलै महिन्यात १.४६ कोटी प्रवाशांनी आरक्षण केले होते. यावर्षी मेमध्ये केवळ २.८ लाख प्रवाशांनी विमानाने प्रवास केला. यावर्षी जुलैमध्ये हवाई प्रवाशांची संख्या वाढून २१.१ लाखांवर गेली. यावर्षी जुलैमध्ये स्टीलचे उत्पादन ७४.०२ लाख टन आणि सिमेंटचे उत्पादन २४२.४७ लाख टन होते. गेल्या वर्षी जुलैमध्ये स्टीलचे उत्पादन ८६.१३ लाख टन आणि सिमेंटचे उत्पादन २८० लाख टन होते. मंत्रालयाच्या मते, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये वीज वापर ९७ टक्क्यांवर पोहोचला होता. ऑगस्टमध्ये १३.८ लाख कोटी ईव्ही बिल तयार केले गेले, जे मागील वर्षाच्या ९७ .२ टक्के इतके आहे.