मराठी

१९ ऐवजी २० ऑक्टोंबरला जाणार संत्र्याची पहिली खेप

नागपुर येथे पार पडलेल्या रेल्वे अधिका:यांच्या बैठकीत निर्णय

वरुड/दि.१० – वरुड संत्रा नगरी रेल्वे स्टेशन ते बेनापोल (Bangladesh) येथे येत्या १९ ऑक्टोंबरला रेल्वेची संत्रा घेवुन जाणारी पहिली खेप जाणार होती; परंतु आज नागपुर येथे रेल्वे अधिकारी आणि बांगलादेशामध्ये संत्रा पाठविणारे संत्रा निर्यातदार यांच्यात पार पडलेल्या बैठकीत १९ ऐवजी २० ऑक्टोबरला संत्र्याची पहिली खेप पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय सडक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने रेल्वे पार्सल व्हॅन द्वारे देशांतर्गत व देशाबाहेर संत्रा पाठविण्यास सुचित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने वरुड ते नागपुर येथे रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिका:यां सोबत बैठकीचे सत्र सुरु होवुन येत्या १९ ऑक्टोबर २०२० ला बहु प्रतिक्षित रेल्वेद्वारे संत्र्याच्या निर्यातीस मंजुरात मिळाली होती. या रेल्वे पार्सल व्हॅनद्वारे अंदाजे ४६० मे.स.संत्र्याची बांगलादेश येथे निर्यात होणार असुन रियाज फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी, श्रमजिवी नागपुरी संत्रा प्रोड्युसर कंपनी, एम.के.सि. अॅग्रोफेथ लिमीटेड, ए.आर.सि.फु्रट वरुड, एस.एफ.सी., जे.के.फु्रट कंपनी, ताज फु्रट कंपनी, डायमंड फु्रट कंपनी यांचा संत्रा बांगलादेश येथे निर्यात होणार होता.
यासंदर्भात नगर परिषद सभागृह वरुड येथे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक कृष्णंथ पाटील, महसुल विभागाचे उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले, तहसिलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक सुद्धा पार पडली होती. त्यानुसार संत्रा नगरी वरुड रेल्वे स्टेशन येथुन संत्र्याची बोगी पाठविण्याकरिता आवश्यक ती तयारी सुद्धा क रण्यात आली होती; परंतु आज नागपुर येथे पार पडलेल्या या बैठकीमध्ये काही तांत्रिक कारणास्तव संत्र्याची पहिली खेप १९ ऐवजी २० ला पाठविण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला.
सदर बैठक केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांचे स्विय सहाय्यक भालेराव नागपुर विभागीय रेल्वे अधिकारी सोमेश्वर, कृष्णनाथ पाटील, सुरेश स्टील, संजय गंभीर यांचेसह बांगलादेशामध्ये संत्रा पाठविणारे संत्रा निर्यातदार ताजखान मजनेखान, श्रमजिवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीचे मुख्यकार्यकारी अधिकारी रमेश जिचकार, सोनु खान, रियाज खान, राजीक कुरेशी, जावेद खान, जुबेर भाई, पुरुषोत्तम लकडे, महा ऑरेंजचे डायरेक्टर श्रीधर ठाकरे, राहुल ठाकरे यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button