पहिल्याच लसीची रिएक्शन
लंडन दि १० – जगातील पहिली स्वीकृत लस जारी करणारा ब्रिटन हा पहिला देश ठरला. स्वीकृतीच्या केवळ २४ तासांतच लसीबाबतच्या समस्या पुढे आली आहेत. लसीचे डोस घेतलेले दोन आरोग्य कर्मचारी आजारी पडले आहेत. आजारी कर्मचाऱ्यांची नावे मात्र अजून स्पष्ट झालेली नाहीत; परंतु दोघांनाही लसीमुळे रिअॅक्शन आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यानंतर आता ब्रिटनच्या हेल्थकेअर प्राॅडक्ट रेग्युलेटरी एजन्सीने एक सूचना जारी केली आहे. एखादी गोष्ट खाल्ल्याने किंवा औषधांची अॅलर्जी असल्यास लसीचा डोस घेऊ नये, असे नियामक संस्थेने स्पष्ट केले आहे.
अॅलर्जीची समस्या असलेल्या किती लोकांना फायझरच्या लसीपासून रोखले जाणार आहे, हे मात्र स्पष्ट झालेले नाही; परंतु ही संख्या अंदाजे ७० लाखांवर जाते. अशा लोकांना तज्ज्ञांद्वारे उपचार घ्यावे लागत आहेत. नवीन लसीमुळे अॅलर्जीचे काही रुग्ण आढळून येणे स्वाभाविक आहे, असे आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या एनएचएसला वाटते. लसीच्या डोसमुळे शरीराच्या तापमानात चढ-उतार,
-
उलटी इत्यादी साइड इफेक्ट होऊ शकतात.
अमेरिकेत फायझर लसीच्या परीक्षणादरम्यान चार जणांना चेहऱ्याचा लकवा (बेल्स पाल्सी) झाला होता. सामान्यपणे हा अस्थायी स्वरूपाचा असतो. त्यात चेहऱ्याच्या एका बाजूच्या मांसपेशी क्षीण होतात. नर्व्ह योग्य पद्धतीने काम करत नसल्याने तसे होते. अमेरिकेत २१ हजार ७२० लोकांवर त्याचे परीक्षण करण्यात आले होते. त्यापैकी चार जणांना बेल्स पाल्सी झाले होता.
चीनची लस ८६ टक्के प्रभावी असल्याचा दावा संयुक्त अरब अमिरातीने केला. त्यावरून ही लस पश्चिमेकडील देशांनी विकसित केलेल्या लसीचा मुकाबला करण्यासाठी सक्षम आहे, हे लक्षात येते. ही लस चीनची कंपनी सायनोफार्मने विकसित केली. ही लस गंभीर रुग्णांसाठी शंभर टक्के उपयोगी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्याशिवाय लसीकरणाचे गंभीर साइड इफेक्टदेखील नाहीत.