प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार
अमरावती विद्यापीठाचा सर्व महाविद्यालयांना आदेश
अमरावती प्रतिनिधी/ ९ ऑगस्ट – इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षा निकाल जाहिर झाल्यावर संगाबा अमरावती विद्यापीठाने विभागातील सर्व महाविद्यालयांना आदेश देत सांगितले आहे की, स्नातक प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया ४ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान पूर्ण करण्यात यावी. या अंतर्गत ३१ ऑगस्टपूर्वी स्नातक प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत संपविण्याचे सांगितले आहे. अशात श्नयता वर्तविल्या जात आहे की, येत्या १ सप्टेंबर पासून विभागातील महाविद्यालयांमध्ये नविन शैक्षणिक सत्राचे ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण सुरू होईल. आतापर्यंत विद्यापीठाव्दारे स्नातक व्दितीय वर्ष, तृतिय वर्ष, तथा चतुर्थ वर्ष व स्नातकोत्तार म्हणजे पीजी कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात कोणतेही दिशा निर्देश जाहिर करण्यात आले नाही आहे. कारण आता स्नातक अभ्यासक्रमाचे निकाल जाहिर झाले नाही आहे. तर स्नातक अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परिक्षा घेणे अथवा न घेण्याचे प्रकरणही रखडले आहे. अशात पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमात प्रवेश प्रक्रिया घेण्यासंदर्भात सध्या निश्चितपणे काहीही सांगता येवू शकत नाही. विशेष म्हणजे, हल्ली कोरोना संसर्गामुळे जीवणाचे सर्व क्षेत्र खूप प्रभावित झाले आहे. व शिक्षण क्षेत्राचे वेळापत्रकही गडबडले आहे. दरवर्षी राज्यात शाळा व महाविद्यालयांचे नविन शैक्षणिक सत्र २६ जून पासून सुरू होते. मात्र यावर्षी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता लागू करण्यात लॉकडाउनमूळे हे करणे श्नय होउ शकले नाही. विद्यापीठाच्या परिक्षा व परिक्षा निकाल जाहिर करण्याचे नियोजनण पूर्णपणे गडबडण्यासोबतच याचा थेट परिणाम महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेवरही पडला आहे.
स्नातक व स्नातकोत्तर अभ्यासक्रमाचे परिक्षा निकाल अजुनही जाहिर करता येवू शकले नाही आहे. तर स्नातक अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परिक्षा घेणे अथवा न घेणेबाबत खूप अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील इयत्तेत प्रवेश अडकून पडला आहे. मात्र दुसरीकडे राज्य शिक्षण मंडळासह केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाव्दारे इयत्ता १२ वी परिक्षा निकाल जाहिर करण्यात आले. त्यामुळे इयत्ता १२ वी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांमध्ये आता पुढील इयत्तेत प्रवेशाकरीता उत्कंठा दिसुन येत आहे. ही बाब लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाव्दारे विभगातील सर्व महाविद्यालयांना निर्देशित करण्यात आले आहे की, विविध अभ्यासक्रमातील प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात यावी जेणेकरून इयत्ता १२ वी परिक्षा उत्तीर्ण केलेले विद्यार्थी आपल्या आवडीच्या महाविद्यालय व अभ्यासक्रमाला प्रवेश घेउ शकणार. ही प्रवेश प्रक्रिया ४ ऑगस्टपासून सुरू झाली आहे व ३१ ऑगस्ट पर्यंत चालणार. ३१ ऑगस्टपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया संपविण्याचे आदेश जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे आशा व्यक्त केली जात आहे की, येत्या १ सप्टेंबरपासून विभागातील महाविद्यालयांमध्ये कमीतकमी प्रथम वर्षाचे वर्ग सुरू होतील.
ऑनलाईन प्रवेशावर भर या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आलेली प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे नोंदणीकरण, व्हेरिफीकेशन, अलोकेशन, अलॉटमेंट सारखे सर्व टप्पे ऑनलाईनच पूर्ण होतील. त्याचबरोबर पूर्ण प्रक्रिये नंतर विद्याथ्र्यांना आपला प्रवेश निश्चित करण्याकरीता आपले सर्व कागदपत्रे घेवुन केवळ एकदाच त्यांना आवंटित महाविद्यालयात प्रवेशाकरीता जावे लागणार. यातही सर्व संबंधित महाविद्यालयांव्दारे या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत त्यांच्या महाविद्यालयात प्रवेश घेणाèया विद्याथ्र्यांना प्रवेशाकरीता महाविद्यालयात येण्याकरीता दिवस व वेळेच्या माहितीबाबत एसएमएस पाठविण्यात येईल. ही व्यवस्था याकरीता करण्यात येत आहे जेणेकरून एकाचवेळी महाविद्यालयात विद्याथ्र्यांची गर्दी होवू नये.