वरुड दी ५ – सततच्या पावसामुळे आणि नदीला आलेल्या पुरामुळे पाणी शेतात घुसून संत्रा झाडांसह शेत वाहून गेल्याची घटना मौजा अंतरखोप शेतशिवारामध्ये घडली. याप्रकरणी शेताचा पंचनामा करुन शासकीय मदत देण्यात यावी व संरक्षण भिंत बांधून देण्यात यावी, अशी मागणी संबंधित शेतक:यांनी केली आहे.
यासंदर्भात दिलीप चौधरी या शेतक:यांने तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, माझे शेत मोजा- अंतरखोप शेत शेत गट नं २०/१, हे शेत असुन या शेतात संत्रा फळे येणारी झाडी आहे; परंतु माझेच शेताला लागुन चुडामण नदीपात्र असल्याने पावसाळयाचे नदीचे पुराचे पाण्यामुळे माझे शेत सन् १९९१ चे महापुरापासुन खचत आहेे. त्यामुळे माझे शेतातील दोन हारी संत्रा झाडी पुराच्या पाण्याने वाहुन गेलेले आहेे. माझ्याजवळ फक्त दोन एकर शेत असुन माझे कुटुंबाचा उदरनिर्वाह या शेतातील संत्रा फळावरच अवलंबुन आहेे जर दरवर्षी पुराचे पाण्याने संत्रा झाडे वाहुन गेले तर माझा संत्रा बगिचा पुर्ण नष्ट होवुन शेतातील काहीच उत्पन्न निघु शकत नाही. त्यानंतर माझ्यावर उपासमारीची पाळी येईल तसेच माझ्या शेतातील संत्रा झाडाचे झालेल्या नुकसानाची भरपाई मला मिळण्यात यावी याशिवाय माझे शेताला लागुन संरक्षण भिंत बांधून देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.