मकिार्डीअॅक रुग्णवाहिकेसाठी मदतीचा ओघ सुरुच
डॉ.राम व साहिल गोधने, विपुल व राहुल पटेल यांचा पुढाकार
वरुड/दि.१० – समाजप्रबोधन मंचच्या पुढाकाराने गेल्या काही दिवसांपासुन कार्डीअॅक रुग्णवाहिका उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील बालरोग तज्ञ डॉ.प्रविण चौधरी व प्रसुती तज्ञ डॉ.समता चौधरी यांचे सुपूत्र विर चौधरी याचे वाढदिवसानिमित्त समाज प्रबोधन मंचाद्वारे नियोजित कार्डीयाक अॅबुलन्स उपक्रमात २ लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाल्यानंतर या रुग्णवाहिकेसाठी निधीचा ओघ सुरु झाला आहे. शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ.राम गोधने व त्यांचे सुपुत्र साहिल गोधने, शहरातील उद्योजक विपुल पटेल व राहुल पटेल यांनी सुद्धा या रुग्णवाहिकेकरिता भरीव अशी मदत समाज प्रबोधन मंचला केली आहे.
समाजप्रबोधन मंचच्या पुढाकाराने लोकवर्गणीतुन वरुड शहरासह तालुक्यातील रुग्णांकरीता कार्डीअॅक रुग्णवाहिका खरेदी केल्या जाणार आहे. वरुड शहरापासून नागपुर आणि अमरावतीचे अंतर दूर असल्यामुळे तेथपर्यंत रुग्ण पोहचण्याकरीता कार्डीअॅक रुग्णवाहिका महत्वाची असून त्या रुग्णवाहिकेतून रुग्णाला उपचाराकरीता नेल्यास रुग्ण सुरक्षित जावु शकतो अद्यापही वरुडमध्ये कार्डीअॅक रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. अशा स्थितीत समाजप्रबोधन मंच विविध उपक्रमाच्या माध्यमातून दानदात्यांना प्रोत्साहीत करुन या रुग्णवाहिकेकरीता दान मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ.राम गोधने व त्यांचे सुपुत्र साहिल गोधने यांनी १ लाख रुपयांचा धनादेश समाज प्रबोधन मंचच्या स्वाधीन केला. यावेळी डॉ.अनिता गोधने, समाजप्रबोधन मंचचे अध्यक्ष डॉ.प्रविण चौधरी उपस्थित होते. शहरातील प्रसिद्ध उद्योजक विपुल पटेल यांनी सुद्धा ६१ हजार रुपयांचा निधी समाज प्रबोधन मंचच्या स्वाधीन केला तर युवा उद्योजक राहुल पटेल यांनी त्यांचे वडील स्व.विनुभाई पटेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २ लाख रुपयांचा निधी समाजप्रबोधन मंचच्या स्वाधीन केला.
या महत्वाकांक्षी उपक्रमासाठी २५ लक्ष रुपयाच्या निधीची आवश्यकता असून या पवित्र कार्यात देणगी देऊन अनेकांचे प्राण वाचवावे, असे आवाहन समाजप्रबोधन मंचच्या पदाधिका:यांनी केले आहे.
याप्रसंगी समाजप्रबोधन मंचचे अध्यक्ष डॉ.प्रविण चौधरी, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ.राम गोधने, बालरोग तज्ज्ञ डॉ.प्रफुल होले, डॉ.महेेंद्र राऊत, जितेन शाह, पिंटु ताथोडे, मनिष कुबडे, स्वप्निल वडवाले यांचेसह आदी उपस्थित होते.