मराठी

आनंदाची बातमी: रशिया करणार १२ ऑगस्टला कोरोना लसीचे रजिस्ट्रेशन

उप-आरोग्य मंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी दिली माहिती

मॉस्को/दि.७– संपूर्ण जगात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यातच रशियातून एक अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. बर्याच दिवसांपासून लोक ज्या कोरोना लसीची प्रतीक्षा करत होते, त्यांची ती प्रतीक्षा आता संपली आहे. आता रशिया 12 ऑगस्टला कोरोना व्हायरसवरील लसीचे रजिस्ट्रेशन करणार आहे. या बाबत उप-आरोग्य मंत्री ओलेग ग्रिडनेव माहिती दिली आहे. माहिती असेलच कि या लसीच्या परीक्षणास 18 जूनला सुरूवात करण्यात आली होती. यात 38 स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. या संर्व स्वयंसेवकांत रोगप्रतिकारशक्ती तयार झाली. यातील पहिल्या गटाला 15 जुलैला तर दुसऱ्या गटाला 20 जुलैला सुट्टी देण्यात आली होती. यापूर्वी ही लस 10 ऑगस्ट अथवा त्यापूर्वीच बाजारात उपलब्ध होईल, असा दावा करण्यात आला होता.

Back to top button