मराठी

पालकमंत्री घेणार कोरोना उपाययोजनांचा आढावा

पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर यांचा दौरा

अमरावती, दि.११ : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत उद्या (12 मार्च) विविध कार्यक्रम होणार आहेत.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : सकाळी 10.25 वा. अमरावती निवासस्थानाहून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण, सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व फिरते पशु रूग्णालय मोबाईल व्हॅनचे लोकार्पण, सकाळी 10.45 वाजता कोरोना रोगाबाबत जनजागृती मोबाईल व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन, सकाळी 11 वाजता महिला व मुलींच्या संरक्षणाबाबत जनजागृतीपर मोबाईल व्हॅनचे लोकार्पण, सकाळी 11.15 वाजता कोरोना प्रतिबंधाबाबत उपाययोजनांबाबत अधिका-यांशी चर्चा, सकाळी 11.45 वाजता शेवती येथील सिंचन तलाव पुनर्वसनअंतर्गत लाभार्थ्यांना अतिरिक्त मोबदल्याचे धनादेश वाटप, दुपारी 12.15 वा. आष्टीकडे प्रयाण
दुपारी 12.45 वा. आष्टी येथे आगमन व संजय खर्चान यांच्याकडे लग्नाप्रित्यर्थ भेट, दुपारी 1.15 वाजता अरमाळे कुटुंबाला सांत्वनपर भेट, दुपारी 1.45 वा. शेंद्रे कुटुंबियांना सांत्वनपर भेट, दुपारी 2.15 वाजता साऊरकडे प्रयाण, दुपारी 2.25 वाजता साऊर येथे आगमन व बोंडे कुटुंबाला सांत्वनपर भेट, दुपारी 3 वाजता अमरावतीकडे प्रयाण, दुपारी 3.30 वाजता निवासस्थानी आगमन व राखीव.

Related Articles

Back to top button