अमरावती/दि. 30 – राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड . यशोमती ठाकूर(yashomati thakur) यांच्या उपस्थितीत उद्या सोमवारी (31 ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बैठका होणार असून, विमानतळ विकास, प्रशासकीय इमारत स्थिती, सिडको विकासकामांसह विविध विषयांचा आढावा पालकमंत्री घेणार आहेत.
त्यांचा नियोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
सकाळी 9.55 वा. निवासस्थान येथून शासकीय विश्रामगृह, अमरावतीकडे प्रयाण, सकाळी 10 वाजता विश्रामगृह येथे आगमन व अभ्यांगतांच्या भेटी, दुपारी 12.55 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण, दुपारी एक वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, मनपा व इतर प्रस्तावित प्रशासकीय इमारतींच्या स्थिती व प्रस्तावाबाबत बैठक, दुपारी 1.45 वाजता चिखलदरा येथे सिडकोद्वारे सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा, दुपारी 2.25 वाजता बेलोरा विमानतळाच्या सद्य:स्थितीबाबत व विकासाबाबत बैठक, दुपारी 2.45 वाजता वैद्यकीय महाविद्यालय अमरावती येथील सद्य:स्थितीबाबत चर्चा, दुपारी 3 वाजता धुळघाट, ता. धारणी येथील ब्रॉडगेज रेल्वे रूळाबाबत व रेल्वे वॅगन, बडनेराबाबत बैठक सायंकाळी 5 वाजता अमरावती निवासस्थान येथे आगमन व राखीव.