नवी दिल्ली/बीजिंग – एप्रिल ते जुलै या कालावधीत भारतीय स्टील निर्यात दुप्पट झाली असून गेल्या सहा वर्षांतील विक्रमी आकडेवारी गाठली आहे. चीन(China) आणि भारतात एकीकडे तणाव सुरू आहे, तर दुसरीकडे चीनमध्ये भारतीय उत्पादनांची(Production) विक्रमी विक्री होत आहे. किंमती कमी झाल्यामुळे विक्री वाढल्याचे व्यापारी सांगतात. देशांतर्गत मागणी कमी झाल्यामुळे भारतीय विक्रेत्यांकडे अतिरिक्त पोलाद आहे. कोरोनामुळे आर्थिक संकट असलेल्या या उद्योगाला अत्यावश्यक असलेले आर्थिक बळही आता मिळाले आहे