मराठी

दिवंगत नेते व माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या मुलाला कोरोनाची लागण

आबांचे भाऊ सुरेश पाटील पण कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

सांगली/दि.३- दिवंगत नेते व माजी गृहमंत्री आर आर आबा पाटील यांच्या कुटुंबातील दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मुलगा रोहित पाटील आणि आबांचे भाऊ सुरेश पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर आमदार सुमनताई पाटील यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रोहित पाटील हे बुधवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक नेत्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे खळबळ उडाली आहे.आर आर पाटील यांच्या आईचा रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत
माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित आर आर पाटील यांच्यासह त्यांचे चुलते सुरेश पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आबांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. तर रोहित पाटील आणि सुरेश पाटील यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरातच आयसोलेशन करण्यास सांगत उपचार सुरू केले आहे. आर आर पाटील यांच्या आईचा रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत आहे.
संपर्कात मोठे नेते आल्याने खळबळ
बुधवारी तिघांची टेस्ट करण्यात आली होती आणि आज रिपोर्ट आला आहे. तर बुधवारी रोहित पाटील हे तासगाव मधील कोरोना हॉस्पिटल उद्घाटनासाठी हजर होते, तर या कार्यक्रमासाठी पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्यासह शासकीय अधिकारी व नेतेही या कार्यक्रमास हजर होते. शासकीय यंत्रणा हादरून गेली आहे तर आबांचे पुत्र रोहित पाटील व त्यांच्या भावाला कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Back to top button