लोकलचे वेळापत्रक सामान्यांच्या सोईचे होणार
मुंबई/दि. ८ – लोकल ट्रेन सर्वांसाठी खुली झाल्यानंतरसुद्धा वेळेवर बंधनेअसल्यामुळेलोकलच्या प्रवाशांमध्ये असंतोष आहे. ठराविक वेळेच्या बंधनामुळेनागरिक कार्यालयात पोहोचू शकत नाहीत किंवा मनाप्रमाणेप्रवास करू शकत नाहीत, यामुळे लोक उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. महाराष्ट्र सरकारविरोधात संताप व्यक्त करली आहेत. काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोकलच्या वेळेत बदल करण्याचेसंकेत दिले. कोरोना रूग्णांची संख्या पूर्वीच्या तुलनेत चांगलीच घटली आहे. सुमारेआठवडा उलटूनही कोरोनाच्या रुग्णांची संख्या फारशी वाढलेली नाही. पुढील 15 दिवस अशीच परिस्थिती कायम राहिल्यास सामान्य नागरिकांच्या सोईचे वेळापत्रक केले जाईल आणि मुंबईकरांना दिलासा मिळेल, असेपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. काकाणी यांना मुंबईतील नायर रुग्णालयात कोरोनाची लस देण्यात आली. ही लस दिल्यानंतर काकाणी यांनी सांगितलेकी, मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या पुढील पंधरवड्यापर्यंत वाढली नाही, तर लवकरच वेळेचे निर्बंध दूर करण्यावर विचार केला जाईल