वरुडमध्ये २४ ते २७ दरम्यान बाजारपेठ बंद राहणार
सर्व व्यापारी संघटनांनी एकत्र येवुन घेतला निर्णय : शासनाचेही सहकार्य
वरुड प्रतिनिधी। २१ – गेल्या काही दिवसांपासुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना येत्या २४ ते २७ सप्टेंबर दरम्यान वरुड शहरातील बाजारपेठ बंद ठेवुन जनता कफ्र्यू लागु करण्याचा निर्णय शहरातील सर्व व्यापारी संघटना, विविध स्वयंसेवी संघटना आणि राजकीय संघटनांनी घेतला आहे. यासंदर्भात आज या सर्वांच्या शिष्टमंडळाने तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी, ठाणेदार आणि न.प.मुख्याधिकारी यांची भेट घेवुन जनता कफ्र्यू करीता सहकार्य करण्याची विनंती केली.
प्राप्त माहीतीनुसार वरुड शहरासह संपुर्ण तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, सोबतच रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सुध्दा वाढत आहे, अशा स्थितीत कम्युनिटी स्प्रेड होत असल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने बाजारपेठ बंद ठेवण्याचा प्रयत्न काही स्वयंसेवी संघटनानी सुरु केला आणि त्यासंदर्भात काही बैठका सुध्दा पार पडल्या. वरुड व्यापारी संघ, वरुड युवा व्यापारी संघ, दी वरुड कंझुमर प्रॉडक्टवस डिस्ट्रिब्युटर्स असोशिएशन, वरुड तालुका भाजपा व्यापारी आघाडी यांच्यासह विविध राजकीय व स्वयंसेवी संघटनांच्या पदाधिका:यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत २३ ते २७ सप्टेंबरदरम्यान जनता कफ्र्यू लागु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासंदर्भात या सर्व व्यापारी बांधवांनी विविध अधिका:यांच्या भेटी घेवुन त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, बाधीतांची संख्या कमी करण्याकरीता वरुड तालुक्यात ७ दिवसांची संचारबंदी लागू करावी जेणेकरून साखळी खंडित होण्यास मदत होईल, दवाखान्यातील बेड व औषधांची क्षमता वाढवावी, दारू दुकाने, बार, किराणा, कृषी औषधालय इत्यादीवरही बंदी आणल्यास संचारबंदी साठी मदत होईल, अतिआवश्यक दूध, पेट्रोल पंप याची वेळ मर्यादा सकाळी ६ ते २ पर्यंत ठेवल्यास संचार मर्यादित होईल, तालुक्यातील लोकसंख्या २ लाखाच्या वर असल्यामुळे कोविड बाधितांची संख्या वाढत असल्याने वरुड तालुक्यासाठी १०० बेडची सुविधा असलेले कोविड सेंटरची निर्मिती करण्यात यावी, तालुक्याला लागून असलेल्या ५ जिल्ह्यातील अंतर १०० किलोमीटर पेक्षा जास्त आहे त्यामुळे रुग्णांची ने-आण करताना कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यावर उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात अधिका:यांच्या भेटी घेतल्यानंतर सर्व अधिका:यांनी कोरोनाची साखळी तोडण्याकरीता लॉकडाऊन आवश्यक असल्याचे सांगुन लॉकडाऊनसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी वरुड व्यापारी संघाचे सचिव डॉ.रवि यावलकर, वरुड युवा व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेश अग्रवाल, दी वरुड कंझुमर प्रॉडक्टवस डिस्ट्रिब्युटर्स असोशिएशन तथा वरुड तालुका भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष जगदीश उपाध्याय, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख किशोर माहोरे, शिवनारायण उपाध्याय, वरुड व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष रितेश शाह, प्रा.किशोर तडस, अनिल हेटे, भोलानाथ वाघमारे, राजु मानकर, छोटू विटाळकर, किशोर शेगेकर, धर्मेद्र जोशी, आनंद खेरडे, विनय चौधरी, अॅड.शांतीभुषण छांगाणी, कन्नुभाई पटेल, चेतन खासबागे, संदीप तरार, अंशुमन मानकर, गोपाल पटेल, राजु गावंडे, भुषण काळे, पप्पू चांडक, अरुण करीया, कैलास उपाध्याय, तुषार काळे, प्रफुल्ल अनासाने, पंकज अनासाने, कपूर धरमठोक, पंकज अनासाने, अजय तिवारी, धिरज गुल्हाने, प्रविण वाडबुध्दे, मंगेश ढोरे, मुकेश देशमुख, नंदकिशोर पनपालिया, योगेश गणोरकर, नंदू टाकरखेडे, प्रविण डाफे, यशपाल जैन, कल्याणजी कोटेजा यांच्या आदी व्यापारी आणि शहरातील नागरिक उपस्थित होते.