मराठी

नागपूरचे महापौर पॉझीटीवच्या संपर्कात आले

स्वताहला केले क्वारेंटाईन

प्रतिनिधि/दी.६ नागपूर– कोरोनाचा प्रादूभार्व दिवसांदिवस वाढतच चालला आहे. या प्रादूर्भावात नागपुरचे महापौर संदीप जोशी सुद्धा आले आहेत. या बाबत महापौर संदीप जोशी यांनी टिव्टर वरून माहिती दिली आहे. तसेच आपल्या टिव्टरच्या माध्यमातून त्यांनी सांगितले आहे कि ते कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांनी सावधगिरी बाळगत सात दिवस विलग राहण्याचा निर्णय घेतला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने विलग राहण्याचा निर्णय घेतला आहे असे म्हटले आहे. तसेच ज्या व्यक्ती आपल्या संपर्कात बुधवार संध्याकाळपासून होत्या, त्यांनीही स्वविलगीकरणाचा निर्णय घ्यावा असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button