मराठी
मनपा आयुक्त यांनी केली आयसोलेशन दवाखाना व विलासनगर येथील केंद्राची पाहणी
अमरावती दि १२ – आयसोलेशन दवाखाना दसरा मैदान व विलासनगर शाळा क्र.17 या आर.टी.-पी.सी.आर. व अँनटीजंन्स टेस्ट सेंटरची पाहणी आज महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी केली.
विलास नगर येथील महानगरपालिकेच्या 17 नंबर च्या शाळेची पाहणी मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी आज केली. या ठिकाणी कोव्हीड 19 चाचणीकरिता आर.टी.-पी.सी.आर. टेस्ट सेंटर सुरु करण्यात आले आहे. सेंटरला आवश्यक असणा-या सर्व बाबी या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. या सेंटरवर येणा-या लक्षणे बाधीत व्यक्तींना योग्य अशी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे असेही यावेळी त्यांनी सांगितले.
सदर सेंटरमुळे तपासणीची प्रक्रिया गतीमान झाली असून नागरिकांना सदर सेंटर वरील कर्मचा-यांनी येथे येणा-या व्यक्तींना योग्य मार्गदर्शन करावे अश्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
सेंटरला आवश्यक असणा-या सर्व बाबी या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. या चाचणीमुळे 15 ते 20 मिनिटात रुग्ण पॉजिटीव्ह असल्याचे निदान केले जाते तसेच चाचणी नकारात्मक असल्यास आर.टी.पी.सी.आर. करणे अपेक्षित आहे. पॉजिटिव्ह रिपोर्ट लवकर मिळाल्यामुळे संबंधीत रुग्णाला लवकरात लवकर वैद्यकीय उपचार मिळत आहे. कंटेन्मेंट टॅमिनाटेड आणि हॉट स्पॉट मधील आय.एल.आय. तसेच सारी च्या रुग्णांना व comorbidity च्या रुग्णांना याचा लाभ होत आहे. परिसरात आढळणाऱ्या आय.एल.आय. व सारी च्या रुग्णांची तपासणी सुद्धा येथे करण्यात येत आहे.
या सेंटरवर येणा-या लक्षणे बाधीत व्यक्तींना योग्य अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे असेही यावेळी आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले.
महानगरपालिका, अमरावती कार्यक्षेत्रातील कोव्हीड-19 रुग्ण बाधीत रुग्णांचे रहिवासी विभागामध्ये तयार करण्यात आलेल्या कंटेन्मेंट झोन किंवा हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये शहरी आरोग्य केंद्रामार्फत करण्यात येणा-या दैनंदिन घरोघरी करण्यात येणा-या सर्वेक्षणांतर्गत आढळून येणारे एस.ए.आर.आय./आय.एल.आय. रुग्ण आढळून आल्यास त्यांची कोव्हीड-19 चाचणी करणे अपेक्षित असून त्याकरीता महानगरपालिका, अमरावती कार्यक्षेत्रामध्ये दोन ठिकाणी (1) मनपा आयसोलेशन हॉस्पीटल दसरा मैदान व (2) मनपा शाळा क्र.17 विलास नगर, अमरावती येथे रॅपिड अॅन्टीजेन सेंटर व आर.टी.-पी.सी.आर. कार्यान्वित करण्यात आलेले असून रॅपिड अँन्टीजेन चाचणीमुळे 15 ते 20 मिनिटात रुग्ण पॉजिटीव्ह असल्यास निदान केले जाते. तसेच चाचणी नकारात्मक आल्यास आणि रुग्णास लक्षणे असल्यास आर.टी.-पी.सी.आर. करणे अपेक्षित आहे ही बाब लक्षात घेवून जास्तीत जास्त रुग्ण शोधण्यास मदत होत आहे.
ज्या रुग्णांची रॅपिड अँन्टीजेन टेस्ट पॉझिटीव्ह येईल त्या व्यक्तीला असलेल्या लक्षणांनुसार कोरोना केअर सेंटर, कोरोना हेल्थ सेंटर कोव्हीड हॉस्पीटलमध्ये संदर्भीय करण्यात येईल. तसेच त्या व्यक्तीचे कोव्हीड-19 चे मार्गदर्शन सुचनांनुसार कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व इतर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येईल. रॅपिड अँन्टीजेन टेस्ट निगेटीव्ह आढळून आल्यास व रुग्णामध्ये कोव्हीडची लक्षणे दिसत असल्यास रुग्णाच्या घशातील स्त्रावाचा नमुना आर.टी.-पी.सी.आर. टेस्ट करुन घेणे निदान करणे आवश्यक असते तसेच सदर रुग्णाचा आर.टी.-पी.सी.आर. चा निष्कर्ष पॉझिटीव्ह आल्यास लक्षणानुसार कार्यवाही करण्यात येईल. रुग्ण निगेटीव्ह आल्यास रुग्णाला डिस्चार्ज करण्यात येईल असे यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी सांगितले.
ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वसनाचा त्रास असल्यास, वृध्द व दिव्यांग व्यक्तींना काही त्रास असल्यास, कोणतेही व्यक्ती कोव्हीड-19 च्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती शहरी आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिका-यांनी द्यावी व नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला देत सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला. परिसरातील नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे.