नांदगांव पेठ/दि १२ – संताजी जगनाडे महाराज यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर संत तुकाराम महाराजांचे प्रेरणादायी अभंग पुन्हा लिहून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले.होते संताजी म्हणून वाचले तुकाजी असे म्हटले जाते त्यामुळे तुकाराम महाराजांना अभंगांच्या माध्यमातून आज घराघरात पोहचविण्याचे महान कार्य संताजी जगनाडे महाराज यांनी केले.हे प्रेरणादायी विचार आजच्या युवकांनी आचरणात आणणे काळाची गरज असून हे विचार समाजाला तारू शकतात असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेनेचे नेते नितीन हटवार यांनी बोलतांना व्यक्त केले.
अखिल तेली समाज संघटन अमरावती जिल्ह्याच्या वतीने आयोजित संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच संत काशीनाथ बाबा सभागृहात आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी अध्यक्ष म्हणून नितीन हटवार लाभले होते तर प्रमुख अतिथी म्हणून स्व. हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष व भाजप नेते विवेक गुल्हाने,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर साखरवाडे,पत्रकार मंगेश तायडे, अमोल व्यवहारे, संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश साकोरे, एकनाथराव चोपकार, सोमेश्वरराव साकोरे,महादेवराव गभने विचारपीठावर उपस्थित होते.
संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करून तसेच दीप प्रज्ज्वलन करून मान्यवरांनी अभिवादन केले.तेली समाजातील प्रतिष्ठित नागरिक मारोतराव वंजारी व गणेश वंजारी यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.जिल्हाध्यक्ष किशोर साखरवाडे यांनी प्रास्ताविकमध्ये अखिल तेली समाज संघटनेची माहिती देऊन अहंकार सोडा व समाज जोडा असे आवाहन केले, विवेक गुल्हाने यांनी संताजी महाराज यांच्या जीवनचारित्र्यावर प्रकाश टाकला तर मंगेश तायडे यांनी तेली समाजातील युवकांनी संताजी जगनाडे महाराजांचे विचार घरोघरी पोहचविण्याचे आवाहन केले.यावेळी अमोल व्यवहारे, रमेश साकोरे यांनीही आपले विचार व्यक्त केले.कर
कार्यक्रमाला श्रीकृष्ण साकोरे, मोहित राजगुरे, मनोज हटवार, अमोल हटवार, विजय शिरभाते, शिवा साठवणे, निलेश साठवणे, भारत वंजारी, प्रवीण गिरपुंजे, संतोष गभने, शंकरराव बारबुद्धे, राजेंद्र बारबुद्धे, सतीश हटवार, मंगेश हटवार, अंकुश साकोरे, गौरव साखरवाडे, अंकुश गभने, हरिश्चंद्र वैद्य, महादेव बानासुरे,गोविंदराव तलमले,संतोष गडेकर,आकाश हटवार,वसंतराव हटवार,गजानन साखरवाडे,त्रिशूल बारबुद्धे आदी समाजबांधव उपस्थित होते. यावेळी संचालन आकाश साकोरे याने केले तर आभार उपाध्यक्ष सुनील धर्माळे यांनी मानले