मराठी

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढ़ली

१६ हजार ८६७ रूग्ण भेटले

मुंबई/दि.२९ – देशातील आणि राज्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आज एका दिवसात राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत तब्बल 16 हजार 867नी वाढ झालीये. ही आजवरची सर्वात मोठी वाढ आहे. तर देशभरातही 24 तासांमध्ये तब्बल 76 हजार 472 नवे रुग्ण आढळले असून ही आजवरची जगभरातील सर्वात मोठी वाढ ठरली आहे. दिवसभरात राज्यातील 328 जणांचा जीव गेला असून 11 हजार 541 रुग्णांनी कोरोनावर मात केलीये. राज्याचा रिकव्हरी रेट 72 पूर्णांक 58वर गेला आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,64,281 एवढी झाली आहे, यापैकी 1,85,131 रुग्ण एक्टिव्ह आहेत. तर आजपर्यंत 5,54,711 जण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 24,103 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातला सध्याचा मृत्यूदर हा 3.15 टक्के एवढा आहे.
महाराष्ट्रात सध्या पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक एक्टिव्ह रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात एक्टिव्ह रुग्णांचा आकडा 49,365 एवढा आहे. तर ठाण्यामध्ये 20,264 आणि मुंबईमध्ये कोरोनाचे 19,971 एक्टिव्ह रुग्ण आहेत.
पुणे मनपा क्षेत्रात आजच्या एका दिवसात 1,972 रुग्णांची नोंद झाली आहे, यामुळे कोरोना बाधितांचा आकडा 98,573 एवढा झाला आहे. पुणे मनपा क्षेत्रात आजच्या एका दिवसात 32 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण मृतांची संख्या 2,507 एवढी झाली आहे. मुंबईमध्ये आजच्या दिवसभरात कोरोनाचे 1432 रुग्ण आढळले, तर 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईतली कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 7,596 एवढी झाली आहे.

Related Articles

Back to top button