मराठी

अतिश्रीमंतांच्या संख्येत 63 टक्केवाढ होणार

मुंबई/दि.२५ –  देशातील अति श्रीमंत व्यक्तींची संख्या येत्या पाच वर्षात 63 टक्क्यांनी वाढून 11 हजार 198 वर पोहोचेल. मालमत्ता सल्लागार नाइट फ्रँक इंडियाच्या ताज्या अहवालानुसार जगातील ही सर्वाधिक वाढ असेल. ज्याच्याकडेसुमारे217 कोटींची मालमत्ता आहेत्यांना यूएचएनआय म्हटलेजाते. नाइट फ्रँक इंडियाच्या वेल्थ रिपोर्ट2021 नुसार जगभरात आता पाच लाख 21 हजार 653 यूएचआयएनआय आहेत. यापैकी 6,884 यूएचएनआय भारतात आहेत. अहवालानुसार, 2020 ते2025 दरम्यान जगभरात यूएचआयएनआयची संख्या 27 टक्क्यांनी वाढून ती सहा लाख 63 हजार 683 पर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. भारतात या अतिश्रीमंत वाढण्याचा वेग 63 टक्केराहील. आशिया खंडात हाच वेग 39 टक्केअसेल. 2025 पर्यंत अब्जाधीशांची संख्या 43 टक्क्यांनी वाढून 162 होईल. 2020 मध्ये त्यांची संख्या 113 होती. ही वाढ जागतिक आणि आशियातील वाढीपेक्षा जास्त आहे. जगात अब्जाधीशांची संख्या 24 टक्क्यांनी, तर आशिया खंडात 38 टक्क्यांनी वाढ झाली. या अहवालातील अब्जाधीश म्हणजे1 अब्ज रुपयांची मालमत्ता असणारेनसून ज्यांची एक अब्ज रुपयांची किंवा 72 अब्ज रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे, त्यांना या अहवालात अब्जाधीश म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे, हे येथे नोंद घेण्यासारखेआहे. आशियातील वेगवान वेगानेश्रीमंत लोकांची संख्या वाढेल. प्रदेशांनुसार यूएचआयएनच्या संख्येत सर्वात वेगवान वाढ आशियात होईल. आशिया खंडातील सर्वाधिक वाढ इंडोनेशियात 67 टक्केआणि भारतात सर्वाधिक 63 टक्केअसेल. नाईट फ्रँक इंडियाचे सीएमडी शिशिर बैजल म्हणालेकी, साथीच्या रोगानंतर आर्थिक हालचाली वाढल्यानंतर पुढील काही वर्षांत भारत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने जाईल.
सध्या देशातील सर्वात श्रीमंत लोक मुंबई, दिल्ली आणि बंगळूरमध्येराहतात. मुंबईत यूएचएनआयची संख्या आता 920, दिल्लीत 375 आणि बंगळूरमध्ये238 आहे. महत्त्वाचेम्हणजेदेशाच्या यूएचएनआयच्या 91 टक्केलोकांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की, 2021 मध्येत्यांची संपत्ती वाढेल. येत्या काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था बळकट होईल आणि नव्या क्षेत्रांचा विकास होईल. नवीन संधी संपत्ती निर्माण करण्यास मदत करतील. देशात नवीन श्रीमंत लोक उदयास येतील.

Related Articles

Back to top button