मराठी

संत्रा झाडाची नुकसान भरपाई मिळावी

राजेंद्र दळवी यांची जिल्हाधिका:यांकडे मागणी

वरुड/दि. २२ – माझे शेतातील ४ संत्रा झाडे ग्रामपंचायतच्या निष्क्रियतेमुळे तुटली. त्यामुळे त्यांचे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले असुन नुकसान भरपाई करुन द्यावी, अशी मागणी राजेंद्र दळवी यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिका:यांकडे केली आहे.
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, सावंगा ग्रामपंचायतचे मालकीचे मोठे झाड रस्त्यावर आहे. ते झाडे अंदाजे १०० ते १२५ फुट उंचीचे आहे. मी माझ्या शेतात संत्रा झाडे लावले आहेत. त्याचे वय अंदाजे १० वर्षाचे आहे. संत्र्यासह २ पुर्णपणे मोडले आहे. मी या अगोदर अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालय येथे अर्ज दिले तसेच तोंडी सुद्धा सांगितले पण ग्रामपंचायत यांनी माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे माझे २ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. आजही त्या झाडामुळे मोठा धोका आहे. त्याकरिता ते झाड तोडुन पुर्णपणे मोकळे करावे, माझे शेताजवळ बसस्थानकाचा रस्ता आहे. ते झाड मोठे असल्यामुळे त्या रस्त्यावर पडु शकते. तरी जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. झाड तोडुन योग्य तो उपाय करुन माझे शेतातील संत्रा झाडे नुकसान भरपाई करावी, अशी मागणी सावंगा येथील राजेंद्र दळवी यांनी जिल्हाधिका:यांकडे केली आहे.

Related Articles

Back to top button