मराठी

रेल्वेच्या दाव्यावर नीती आयोगाची उडाली झोप

रेल्वेच्या दाव्यावर नीती आयोगाची उडाली झोप अपघातात एकही मृत्यू नसल्याचा दावा

नवी दिल्ली/दि.२० भारतीय रेल्वेने हैराण करणारा दावा केला आहे. रेल्वेच्या दाव्यानुसार या वर्षी अपघातात एकाचाही मृत्यू झालेला नाही, तर गेल्या वर्षी म्हणजेच २०१९-२०२० मध्ये फक्त पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. आता हे वाचल्यानंतर कोणाचीही झोप उडेल. अशीच अवस्था केंद्र सरकारचे ‘थिंक टँक‘ असलेल्या नीती आयोगाची झाली आहे. रेल्वेच्या या दाव्यावर आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्यावर डोक्याला हात लावण्याची वेळ आली. अपघातात एकाचाही मृत्यू न झाल्याच्या रेल्वेच्या दाव्यावर आयोगाने प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. तुम्ही दिलेली आकडेवारी खरी आहे का? कारण मुंबईच्या लोकलमधून प्रवास करताना दर वर्षी किमान दोन हजार लोकांचा मृत्यू होतो. कांत यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव यांना २४ जुलै रोजी लिहलेल्या एका पत्रात ही गोष्ट म्हटली आहे. मुंबईत अनेकांचा मृत्यू हा लोकलमध्ये अधिक गर्दी झाल्याने रेल्वेतून पडून तर काहींचा मृत्यू रुळ ओलाडून प्लॅटफॉर्मवर जाताना होतो. अशा प्रकारच्या मृत्यूची नोंद राष्ट्रीय रेल्वे सुरक्षा कोषात झाली पाहिजे. याची नोंद झाली पाहिजे. तर आपण त्यावर योग्य उपाय योजना करू शकू, असे त्यांनी म्हटले आहे. कांत यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे, की उपनगरीय लोकलच्या डब्यांच्या डिझाइनसाठी पैसे खर्च केले जावेत.

गर्दीमुळे रेल्वेतून खाली पडल्याने मृत्यू रोखण्यासाठी ऑटोमॅटिक दरवाजे लावणे गरजेचे आहे. या गोष्टींची गंभीरपणे नोंद घेतली जावी. रेल्वेच्या दाव्यानुसार २०१९-२० मध्ये फक्त पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. यात एकाही प्रवाशाचा समावेश नाही. हे एक तर रेल्वेचे कर्मचारी अथवा कॉन्ट्रेक्ट मजूर होते. विशेष म्हणजे बोर्डाने रेल्वे अपघातात होणाèया मृत्यूचा यात समावेश केला नाही. राष्ट्रीय रेल्वे सुरक्षा निधीतून ५५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत; पण रेल्वे अपघात कमी करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केलेला दिसत नाही, याकडे कांत यांनी लक्ष वेधले.

Related Articles

Back to top button