मराठी

अमरावतीकर महिलांचा एकच ध्यास “लाख को पचास” हाच खरा विकास

महिला दिनानिम्मित सार्वजनिक वाहतुकीच्या अडचणींवर प्रथमच चर्चा

अमरावती /दि.८ – महिला दिनानिमित्ताने संपुर्ण जगभरात विविध कार्यक्रम साजरे केले जातात ज्यात , महिला सक्षमता , समानता , महिलांचा सत्कार अशाच काही कार्यक्रमांचा अनुभव आपण घेत असतो मात्र श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती व परिसर , पुणे यांच्या समन्वयातून ‘महिला व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था” या विषयावर “महिला प्रवाशांचा आवाज ऐकुयात” ऑनलाइन चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते ज्यात अमरावती मधील विविध क्षेत्रातील महिलांनी त्यांच्या वाहतुकबाबत असलेल्या सर्व अडचणी मांडल्या . हा कार्यक्रम “लाख को पचास” या मोहिमेंतर्गत झाला असून याचे प्रक्षेपण परिसर व YFP च्या फेसबुक पेजद्वारे झाले .
सदर चर्चेत डॉ. स्मिता देशमुख , प्राचार्या श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होत्या , महिलांना माणूस म्हणून एकदा बघायला हवं . जर त्यांना प्रवासच करता येत नसेल तर मग त्यांनी पुढे जायचं तरी कसं ? सिटीबस हा विषय फक्त महिलांचाच नाही तर आरोग्य , सामाजिक , आर्थिक , राजकीय अशा सर्वच विषयांना आधारून आहे असे मत व्यक्त केले , तसेच चर्चेत सहभागी  सामजिक सेवा क्षेत्रातून गुंजन गोळे –  गोकुळ आश्रम यांनी महिलांना घरची व बाहेरच्या कामाची सुद्धा जबाबदारी असते तेव्हा अमरावतीत प्रवासाचे साधनच नाही त्यामुळे रोज असंख्य मजूर महिला रस्त्यावर पायी कामावरून येतांना दिसतात , गाडीत , ऑटोमध्ये त्यांना वाटणारे असुरक्षित भाव हा सर्व बाबींवर त्यांनी चर्चा केली . कला क्षेत्रातून  श्रुतिका गावंडे – अभिनेत्री यांनी नवोदित कलाकार व पत्रकार महिलांची होणारी आर्थिक व सामजिक पिळवणूक या विषयी बोलत असतांना पत्रकार व कलाकारांना शहरात सदैव फिरावे लागते अशा वेळेस स्वताचे वाहन नसल्यावर त्यांना ऑटोवर आधारित रहावे लागते मात्र आर्थिकतेच्या अनुषंगाने तसेच सामजिक व सुरक्षिततेच्या  बाजूने हे परवडणारे नाही त्यामुळे जर वेळीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शहरात संपन्न नाही झाली तर येत्या काळात याचे मोठे परिणाम अशा नवोदित कलाकारांवर होतील असे त्या म्हणाल्या . दिव्यंगाची बाजु मांडण्यासाठी valentina कांडलकर , विद्यार्थिनी यांनी अंध विद्यार्थ्यांना सुद्धा आयुष्य आहे , आम्हाला देखील इतरांसारखे मुक्त फिरावे वाटते मात्र कोणत्याही योग्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुविधा नसल्याने  आम्हाला परिवारातील सदस्यांवर अवलंबून राहावे लागते  तसेच एकट्याने प्रवास करयाचा म्हंटल तर सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण होतो कोण कुठे स्पर्श करतोय हे सांगता येत नाही आणि अशा गोष्टी घरी सांगितल्या कि शिक्षण बंद होते त्यामुळे आम्ही हे सर्व सहन करीत आहोत . फक्त प्रवासाचे साधन नाही म्हणून असंख्य अंध, अपंग विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण दरवर्षी सोडावे लागते . मुद्दा फक्त कॉलेजला येण्याचा नसून कॉलेज सोडून आम्हाला सुद्धा माणुस म्हणून इतरांसारखे जगण्याची इच्छा असते मात्र अशा  व्यवस्थेत हे कसं शक्य होईल ?  स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर यावर विचार करायला हवा अशी विनंती केली .  तेजस्विनी वाकोडे – विद्यार्थिनी , श्री शिवाजी कला व वाणिज्य महा.अम. हिने मुलींच्या प्रवासातील दैनदिन अडचणी ऑटोच्या प्रवासात महिलांची होणारी छेड तसेच खाजगी वाहनच्या प्रवासात देखील येणाऱ्या अडचणी , आर्थिक व सामजिक दबाव यामुळे सुटणारे शिक्षण यावर भाष्य केले .  शालू धाकडे – महिला उद्योगपती Dreamzland यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना कामावर जातांना व येतांना होणाऱ्या अडचणी मांडल्या तसेच आज किमान १० हजार महिलांना अमरावतीमधील कापड मार्केट मध्ये कामाची संधी मिळाली मात्र कामावर जायचे कसे ? पगार ५ हजार आणि प्रवासखर्च ३ हजार तेव्हा घरतरी चालवायचे कसे ? मोठे मार्केट अमरावती बाहेर उभे राहिले मात्र तेथे पोहोचायला सुविधाच नाही तेव्हा कामगार व मालकांनी करावे तरी काय ? अशी व्यथा मांडली . , प्रा.डॉ. वर्षा चिखले – श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय यांनी शासकीय सेवेतील महिला खाजगी वाहनाकडे का वळ्यात हे सांगितले तर  प्रा. सुवर्णा गाडगे , व NSS महिला प्रमुख , श्री शिवाजी कला व वाणिज्य आणि प्रा. डॉ.  ज्ञानेश्वर नामुर्ते NSS प्रमुख , शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय . यांनी त्यांच्या व त्या क्षेत्रातील अडचणी मांडल्या. कार्यक्रमाचा शेवटी परिसर चे राज्यसमंवयक विकास तातड यांनी लाख को ५० मोहिमेची पुढील योजना मांडली व सर्वांचे आभार मानले.
सदर मोहीम मागील १ वर्षापसून राज्यभरात चालविली जात असून “लाख को पचास” अंतर्गत १ लाख लोकांवर ५० सिटीबसेस ची मागणी केली जाते ज्यात ह्या दरम्यान महिलांना किती अडचणींचा सामना करावा लागतो याचे स्पष्टीकरण देण्यात येत असून समनेट व परिसर मार्फत हि मोहीम चालविली जात आहे . सदर चर्चा फेसबुकवर लाइव्ह स्वरूपात उपलब्ध असून ती लोकांनी ऐकावी व मोहिमेत आपले योगदान द्वावे असे आव्हान परिसरद्वारे करण्यात आले . चर्चेचे सूत्रसंचालन प्रशांत राठोड , शहर समन्वयक – परिसर यांनी केले .

Back to top button