नवीदिल्लीः अलीकडेच, नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरणात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. नवीन शिक्षणपद्धती लागू करण्यासाठी शिक्षकही त्याच पद्धतीने तयार करावे लागतील. त्यासाठी बीएडसह केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) आणि शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) चा पॅटर्नही बदलला जाईल. नवीन शिक्षण धोरण लागू झाल्यानंतर केव्हीएस, एनव्हीएस व अन्य केंद्रीय विद्यालयांद्वारे सीटीईटी आणि टीईटी अंतर्गत शिक्षक भरती करण्याच्या पद्धतीही बदलतील. सध्या टीईटी परीक्षा दोन भागात विभागली गेली आहे. भाग १ आणि भाग २ ची परीक्षा घेण्यात आली होती. भाग १ प्राथमिक शाळेत शिकवणा-या शिक्षकांसाठी आणि भाग २ माध्यमिक शाळेसाठी होता; परंतु आता शालेय शिक्षण प्रणालीची रचना बदलल्याने टीईटी आणि सीटीईटीची रचना चार भागात केली जाईल.
राष्ट्रीय नेमणूक संस्था (एनटीए) शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी एक सामान्य योग्यता चाचणी घेईल. यापूर्वी सीबीटीईतर्फे सीटीईटीचे आयोजन केले जात होते. सीटीईटी किंवा टीईटी परीक्षेत उत्तीर्ण होणा-या उमेदवारांना प्रात्यक्षिक किंवा मुलाखत देऊन स्थानिक भाषेत आपली पात्रतादेखील दाखवावी लागेल. कारण नवीन शिक्षण धोरण प्रादेशिक भाषेतील अध्यापन अनिवार्य केले आहे. म्हणूनच शिक्षक प्रादेशिक भाषेत मुलांना शिकविण्यास सक्षम आहेत, की नाही याची चाचणी केली जाईल. नवीन शिक्षण धोरणात, ५ + ३ + ३ + ४ शिक्षण पद्धतीची जागा १० + २ अभ्यासक्रमांनी घेतली आहे. या अभ्यासक्रमाअंतर्गत ५ + ३ + ३ वर्ग १ ते ८ पर्यंतचे आहे. या वर्गांमध्ये सीटीईटी किंवा टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेले शिक्षक शिकवतात. आता या शिक्षकांना नवीन शिक्षण धोरणानुसार मुलांना शिकवावे लागेल.
पाचवीपर्यंत शिक्षण देणा-या शिक्षकांना मातृभाषा, हिंदी किंवा त्यांच्या संबंधित प्रादेशिक भाषेत शिक्षण द्यावे लागेल. सीटीईटी किंवा टीईटी पास शिक्षकांना विद्याथ्र्यांची मूळ भाषा शिकण्यास सांगितले जाईल. नवीन शिक्षण धोरण रोटिंग लर्निंगपेक्षा विश्लेषण-आधारित इंटरएक्टिव्ह शिक्षणावर केंद्रित आहे. आता शिक्षकांनादेखील विषयांची मुख्य आवश्यकता समजून घेणे आणि त्या अनुषंगाने त्यांना शिकवणे आवश्यक असेल. कोणत्याही विषयाबद्दल स्वतःची विचारसरणी विकसित करावी लागेल. अशा परिस्थितीत शिक्षकांना इंटरएक्टिव्ह कोर्सेससाठी स्वत: ला तयार करावे लागेल. सर्जनशीलता असलेल्या मुलांमध्ये नवीन कल्पनांचा विचार करण्याची प्रवृत्ती विकसित करावी लागेल.