दहा लाख कोरोनायोद्ध्यांची दुसर्या डोसाकडेपाठ
मुंबई/दि.१ – आतापर्यंत देशात कोरोना लसीचे1.42 कोटी डोस देण्यात आली आहेत. लसीकरणाचा दुसरा टप्पादेखील एक मार्चपासून सुरू झाला आहे. आजपासून 10 हजार सरकारी आणि 11 हजार खासगी केंद्रांवर लस सुरू होणार आहेत. तथापि, ही बाब चिंताजनक बाब आहेकी, 9.84 लाख आरोग्यसेवक अद्याप लसच्या लसीच्या दुस-या डोसासाठी आले नाहीत.
कोरोनाचा पहिला डोस 16 जानेवारीपासून तर दुसरा डोस 13 फेब्रुवारीपासून दिला जायला लागला. 26 फेब्रुवारीपर्यंत 25 लाख 16 हजार जणांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. आयसीएमआर निवृत्त वैज्ञानिक डॉ. रमण गंगाखेडकर म्हणतात, की जर लसीचा दुसरा डोस घेतला नाही, तर पहिल्या डोसचा काहीच उपयोग नसतो. दुसरा डोस लागूघेतल्यानंतरही, 12-15 दिवस संक्रमणाचा धोका असतो. कारण, संपूर्णप्रतिकारशक्ती येण्यास 40 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो. अशा परिस्थितीत, आपण दुसरा डोस घेण्यास उशीर केल्यास, संसर्गहोण्याचा धोका समान राहील. पहिल्या डोसनंतर, दुसरा डोस 28 व्या दिवशी घेतला जावा; परंतुकाही दिवस उलटून गेले, तरीही जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही. उशीर न करता दुसरा डोस घ्यावा.
एखादा डोस घेतला, तर रोग प्रतिकारशक्ती येते, यात किती सत्य आहे, या प्रश्नावर डॉ. गंगाखेडकर म्हणतात, की अद्याप त्याला कोणताही ठाम वैज्ञानिक आधार नाही, म्हणून कोणत्याही परिस्थितीत दुसरा डोस घेतलाच पाहिजे. आरोग्यसेवकांचा दुसरा डोस चुकला असेल, तर सरकार काय करीत होते. लान्सेटच्या अहवालात म्हटले आहे, की दुसरा डोस तीन महिन्यांत दिला जाऊ शकतो. त्यामुळेलोकांमध्येसंभ्रम निर्माण झाला आहे. म्हणूनच, दुसरा डोस किती दिवस घ्यावा याबद्दल सरकारनेस्पष्ट मार्गदर्शक तत्त्वेजारी करावीत. काही लोक कोरोना विषाणूच्या नवीन रूपांवर लसीच्या परिणामाबद्दल साशंक आहेत. दुसरा डोस न घेण्याचेहेदेखील कारण असूशकते; परंतुअसा विचार करणेचुकीचेआहे.