कोरोना/ दि. ७ – भारतात तयार करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्यांना नागपूरमधील गिल्लूरकर हॉस्पिटलमधून सुरुवात झाली आहे. २७ जुलैपासून सुरू झालेल्या या चाचणीला आज ११ दिवस होत आहे. ५५ स्वयंसेवकांना ही लस टोचण्यात आली आहे. या लसीच्या चाचणीच्या पहिल्या टप्पात सोमावारी दोन पुरुष आणि एका महिलेला ही लस देण्यात आली. त्या लसीचे या व्यक्तींना कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत. आता या लसीचा दुसरा डोस दहा ऑगस्टपासून दिला जाणार आहे.