मराठी

सुरक्षा रक्षकाचा झाला कॅफे मालक

पुणे/दि.८ – पुणे येथे सुरक्षा रक्षकाची नोकरी गेली. काय करावे, हा प्रश्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. नोकरी गेली, तरी डमगगला नाही. धीर सोडला नाही. काही काळ इतरत्र नोकरी केली आणि आता कॅफेमालक होऊन काहींना रोजगारही दिला. ही कथा आहे, रेवण शिंदे या २८ वर्षीय तरुणाची.
रेवण शिंदे यांनी एक कॅफे उघडला आहे. त्यातून त्याला चांगले उत्पन्न मिळत आहे. लोकांसमोर त्याने एक आदर्श घालून दिला आहे. शिंदे सुरक्षा रक्षक म्हणून एका कंपनीत काम करीत होता;  परंतु अचानक नोकरी गमावली. पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागात राहणा-या शिंदे याने धीर सोडला नाही. त्याने कॅफे सुरू केला. शिंदे यांच्याकडे आता पुण्यात ‘कॅफे 18’ नावाचा ब्रँड आहे. रेवण दररोज 600-700 कप चहा विकतो. रेवणला त्याचा खर्च वजा जाता दरमहा पन्नास ते साठ हजार रुपये मिळतात.
रेवण अनेक कॉर्पोरेट कार्यालये आणि औद्योगिक कामगारांना चहा आणि कॉफीचा पुरवठा करतात. कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर आणि कार्यालये पुन्हा सुरू झाल्यावर लोकांना चहा मिळणे अवघड होते. कंपन्यांत जेव्हा चहा मिळणे बंद झाले, तेव्हा त्याने या स्टॉलवरून ग्राहकांना चहा उपलब्ध करुन दिला. हळूहळू हे लोक त्याचे नियमित ग्राहक बनले.
रेवण म्हणाला, की आम्ही प्रतिसाद पाहण्यासाठी विनामूल्य चहा आणि कॉफी देण्याचे ठरविले. आता आम्ही दररोज सुमारे सहाशे ते सातशे  कप चहा विकतो. विशेष म्हणजे, देशात सर्वाधिक कोरोना संसर्गाची नोंद महाराष्ट्रात झाली असून पुण्यामध्ये सर्वाधिक उद्रेक झाला होता.

Related Articles

Back to top button