मराठी

सावत्र आईने प्रियकराच्या मदतीने मुलाचा केला खून

दोघे ही आरोपिनां पोलिसांनी केले अटक

यवतमाळ/दि.११– अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यानेच मुलाचा सावत्र आई व तिच्या प्रियकराने खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. मोझर येथील कमलेश दमडू चव्हाण (32) या विवाहिताच्या मृत्यूप्रकरणातील हे वास्तव आहे. आई व प्रियकर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.
कमलेश चव्हाण याचा मृतदेह 4 ऑगस्ट रोजी सकाळी मोझर येथील स्मशानभूमीत आढळून आला. सर्वांगावर जखमा असल्याने त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र हे कृत्य कुणी केले असावे याचा शोध लागला नव्हता. उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, नेरचे ठाणेदार प्रशांत मसराम, पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील निराळे, गजानन पत्रे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक सचिन पवार यांनी या प्रकरणाचा कसून शोध घेतला. यात कमलेशची आई व तिच्या प्रियकरानेच खून केल्याचे स्पष्ट झाले. सावत्र आई शोभा दमडू चव्हाण (50) व तिचा प्रियकर नरेंद्र ज्ञानेश्वर ढेंगाळे (42) या दोघातील संबंध कमलेशला पटत नव्हते. याच कारणावरून त्यांच्यात वाद होत होता. 3 ऑगस्टच्या रात्री कमलेशला घरातच अर्धमेले केले. नरेंद्र ढेंगाळे याने त्याला उचलून स्मशानभूमीत आणले. याठिकाणी त्याच्यावर चाकूने वार केले. दारूच्या फुटलेल्यी शिशीनेही त्याला भोसकले. सदर दोघांनी पोलिसांपुढे हा सर्व घटनाक्रम उलगडला. या प्रकरणाच्या तपासात ठाणेदार प्रशांत मसराम, पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील निराळे, राऊत, कासम निंसुरीवाले, रोशन गुजर, अनिल डोकडे, योगेश सलामे, राजेश चौधरी, राजेश भगत, सचिन डहाके, ऋषिकेश इंगळे, किरण पडघम, सचिन तंबाके, नीलेश तिडके, एलसीबीचे पोलीस निरिक्षक सचिन पवार, विशाल भगत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.

Related Articles

Back to top button