मराठी
रखवालदारास बांधुन चोरलेला ट्रॅक्टर पाचआंबा शिवारात टाकुन चोरट्यांचा पळ
परतवाडा दि ३ – शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहिरम नजीकच्या सुभानपुर मौजा शेतशिवारातील रखवालदारा बांधुन मारहाण करुन ट्रॅक्टर ट्रालीसह अज्ञात २ चोरट्यानी पळविला असता पथ्रोट नजीकच्या पाचआंबा शिवारातील अंजनगाव कडे जाणार्या मार्गावर स्टेअरिंग राॅड तुटल्याने तिथेच सोडुन पळ काढल्याची घटना उघडकिस आली.
प्राप्त माहीतीनुसार सुभानपुर (बहिरम) मौजा शेतशिवारात मंगल राठोड यांचे शेत असुन शेतातील रखवालदार चुन्नीलाल उईके आहे. रखवालदारास बुधवारी रात्री १२ च्या सुमारास २ अज्ञात चोरट्यानी रखवालदाराच्याच चादरीने हात बांधले तोडास चादर गूंडाळत मारहाण केली.चाकुचा धाक दाखवत खोलीतील चाबी घेवुन ट्रॅक्टर मध्ये स्वतः आणलेले डिझेल भरले वेगळी असलेली ट्राली जोडुन ट्रॅक्टर क्र.एम.एच. २७ बि.व्ही.६९६७ पळविला व लगेच फार्महाऊस मधील आंब्याच्या झाडास धडक दिली असता स्टेअरींगचे बेरींग फुटल्यावर पळवलेला ट्रॅक्टर परतवाडा मार्गे अंजनगावकडे जात असताना पथ्रोट नजीकच्या पाचआंबा मौजा शिवारातील संत्रा मंडीजवळ ट्रॅक्टरचे स्टेअरिंग राॅड तुटले असता ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली उतरला असता तिथेच टाकुन चोरटे पसार झाले. रखवालदाराने हालचाल करुन तोंडावरील कापड सरकवत आरडाओरड करुन शेजारी पेट्रोलपंप असलेल्या शेतातील रखवालदार मदतीला धावुन गेले व लगेच शेतमालकास सुचना दिली शेतमालकाने परतवाडा पोलीसाना कळविले पोलीसानी रात्रीच्या गस्तीपथकास सुचीत केले मात्र उपयोग झाला नाही. सकाळी कुणीतरी ट्रॅक्टर मार्गाच्याकडेला बेवारस असल्याची सुचना पथ्रोट पोलीसाना देताच पोलीस हे. काॅ. गिरी दाखल झाले व संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यास कळविले.
शिरजगाव कसबा पोलीसात गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास सुरु आहे.
महामार्गावर असलेल्या शेतातील रखवालदार व शेतकी साधने चोरीस जातील तर महामार्गावरील पोलीस गस्त आहे काय? असा सवाल राठोड फार्म हाऊसचे मंगल राठोड यानी केला असुन माझा शेतातच जोडधंदा कुक्कुट पालन व्यवसायही आहे आम्ही रखवालदारासह बंदुकधारी सुरक्षारक्षक ठेवायचे काय असा प्रश्न केला आहे.