मराठी

त्या बिबटाच्या तीन पिलांना मिळाले दत्तक पालक

दि ११ ऑगस्ट नागपूर : गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रामधील बिबटांच्या तीन पिलांना दत्तक पालक मिळाले आहेत. चार पिलांपैकी तिघांना वन्यजीवप्रेमींनी दत्तक घेतले आहे. प्रत्येक पिलाच्या देखभालीसाठी 50 हजार रुपयांचा खर्चही गोरेवाडा व्यवस्थापनाकडे सोपविला आहे.
यातील चार पिलांपैकी एका नर पिलाला ए.आर. कन्स्ट्रक्शनने दत्तक घेतले असून त्याचे नाव ‘मुफासा ठेवले आहे. दुसरे मादी पिलू डॉ. आयुषी देशमुख यांनी दत्तक घेऊन त्याचे नाव ‘हंटर ठेवले आहे. तर तिसऱ्या मादी पिलाला डॉ. रोशन भिवापूरकर यांनी दत्तक घेऊन त्याचे नाव ‘डायना ठेवले आहे. 4 ऑगस्टला ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या पिलांना 16 जुलैला गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रात आणण्यात आले होते. 30 जूनला अकोला येथील पातूर वनपरिक्षेत्रातील मोर्णा नदीच्या किनाख्रयावरील पास्टूल परिसरात असलेल्या झुडपांमध्ये ही पिले परिसरातील गावक:यांना दिसली होती. पिलांना जन्म देऊन त्यांची आई निघून गेली होती. वनविभागाला या संदर्भात माहिती मिळाल्यावर घटनास्थळी पोहचून या पिलांना आपल्या ताब्यात घेतले होते. त्यांची आई परत येइल, अशी अपेक्षा असल्याने त्यांना काही दिवस तिथेच सुरक्षित निगराणीखाली ठेवण्यात आले होते. मात्र आई न आल्याने चारही पिलांना गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात संगोपनासाठी   आणले होते

Related Articles

Back to top button