-
अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा
अमरावती दि १८: भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू ट्रकने समोरील दुचाकीला जबर धडक दिल्यामुळे भीषण अपघातात घडला.या अपघातात दुचाकीवरील डॉक्टराचा घटनास्थळीच मृत्यू झाला.हि घटना दर्यापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आसेगाव टी पॉईंट येथे शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.
डॉ प्रवीण पांडुरंग गायकवाड वय 45 रा नवसारी,अमरावती असे मृतक दुचाकीस्वार डॉक्टराचे नाव आहे.गायकवाड हे अमरावती येथील मूळ रहिवासी असून त्यांचे लेहगाव येथे खाजगी रुग्णालय आहे.नेहमीप्रमाणे शनिवारीदेखील ते आपले काम आटोपून दुचाकीने अमरावतीकडे निघाले असता दर्यापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आसेगाव टी पॉईंट येथे शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास गायकवाड यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू ट्रकने जबर धडक दिली.धडक इतक्या तीव्र स्वरूपाची होती कि गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागला.यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती दर्यापूर पोलिसांना मिळताच दर्यापूरच्या महिला पीएसआय प्रिया उमाळे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेऊन गायकवाड यांचा मृतदेह दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविला.याप्रकरणाची नोंद दर्यापूर पोलिसांनी केली असून धडक देणाऱ्या अज्ञात वाहनचालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले असून धडक मारणाऱ्या वाहनाचा शोध दर्यापूर पोलीस घेत आहे.