बीएसएनएल, एमटीएनएल वापरणे सरकारच्या सर्व खात्यांना बंधनकारक
नवीदिल्ली/दि.१४ – आर्थिक संकटाने ग्रासलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) ला केंद्र सरकारकडून दिलासा मिळाला आहे. सरकारने आता बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या दूरसंचार सेवा सर्व मंत्रालये, सरकारी विभाग, सार्वजनिक उपक्रमांना सक्तीचे केले आहे. दूरसंचार विभागाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आता आता सर्व मंत्रालये आणि विभाग, सर्व केंद्रीय संस्था, सार्वजनिक उपक्रमांना बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या सेवा वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. बीएसएनएल, एमटीएनएल नेटवर्क इंटरनेट, ब्रॉडबँड लँडलाईन आणि लीज लाइन लाईनचा वापर सरकारचे सर्व विभाग करतील. २०१९-२० या आर्थिक वर्षात बीएसएनएलचे १५ हजार पाचशे कोटींचे, तर एमटीएनएलचे नुकसान ३६९ कोटींचे होते. या दोन कंपन्यांचे ग्राहक सातत्याने कमी होत आहेत. बीएसएनएलकडे नोव्हेंबर २००८ मध्ये दोन कोटी नव्वद लाख वायरलाइन ग्राहक होते. ते घटून या वर्षी जुलैमध्ये एेंशी लाखांवर आले आहेत. एमटीएनएलचे फिक्स्ड लाइन ग्राहक नोव्हेंबर २००८ मध्ये ३५. ४ लाख होते, ते जुलै महिन्यात ते ३०लाख सत्तर हजारांवर आले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मंत्रिमंडळाने पुनरुज्जीवनाचे पॅकेज म्हणून सार्वभौम बाँडद्वारे निधी उभारण्यासाठी या दोन्ही कंपन्यांना मंजुरी दिली. त्यानंतर कंपनीने सॉवरेन गोल्ड बाँडच्या माध्यमातून ८५०० कोटीहून अधिक निधी जमा केला आहे आणि एमटीएनएल लवकरच सॉवरेन बॉन्डच्या माध्यमातून ६५०० कोटी जमा करेल. शरद यादवांची मुलगी काँग्रेसमध्ये पाटणाः बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकतंत्र जनता जनता दलाची प्रमुख शरद यादव यांची मुलगी सुभाषिनी यादव बुधवारी काँग्रेसमध्ये दाखल झाली. लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी खासदार काली पांडे यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दोघेही बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुका लढविण्याची शक्यता असून ते काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यांचे वडील शरद यादव यांनी नेहमीच पाqठबा दर्शविला असल्याने बिहारमधील महागठबंधनची लढाई पुढे नेण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचे यादव म्हणाल्या. काली पांडे लोक जनशक्ती पक्षापासून वेगळे झाले. काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ते म्हणाले, की ते त्यांच्यासाठी मायदेशी परतण्यासारखेच होते. कारण त्यांनी १९८४ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना लोकसभेचे सदस्य असताना पाqठबा दर्शविला होता. ते म्हणाले, की काँग्रेसमध्ये सामील झाल्याचा मला अभिमान आहे. काँग्रेस हे माझे जुने घर आहे आणि माझ्या जुन्या घरात परत आल्याचा मला आनंद आहे. पांडे यांनी १९८० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळविला आणि त्यानंतर राज्यातल्या गोपाळगंजमधून १९८४ च्या लोकसभा निवडणुकीतही विजय मिळविला. शरद यादव यांना पक्षविरोधी कृत्यात भाग घेतल्याबद्दल ऑगस्ट २०१७ मध्ये संयुक्त जनता दलातून काढून टाकण्यात आले. यानंतर त्यांनी लोकतंत्र जनता दला (LJD) ची स्थापना केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते महायुतीत सहभागी झाले होते आणि या बॅनरखाली मधेपुरा येथून निवडणूक लढवली होती; पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.