भारताच्या लसीकडे जगाचे लक्ष
मुंबई दि २५ – भारताने शेजारी देशांना कोरोनाच्या लसींचा पुरवठा केला असला तरी जगातील दोनशे देशांचे भारताच्या लसींकडे लक्ष आहे. पुणे आणि हैदराबाद या दोन शहरांचा उेख आता लसींची शहरे म्हणून जगभरात व्हायला लागला आहे.
भारताने कोविशिल्डचे दीड लाख डोस भूतानला दिले आहेत. 20 लाख डोस बांगला देशला, दहा लाख डोस नेपाळला आणि एक लाख डोस मालदीवला पाठविण्यात आले आहेत. भारताने अगोदर कंपन्यांना लस निर्यात करायला बंदी घातली आहे. त्यामुळे कंपन्या थेट निर्यात करू शकत नाही; परंतु कंपन्यांकडून लस खरेदी करून त्या मित्र देशांना पाठविण्यात आल्या आहेत. भारत केवळ कोरोना लसीमध्येच महत्त्वाची भूमिका बजावत आहे असे नाही तर इतर अनेक लसी आणि औषधांमध्येही जग आपल्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. 1969 मध्ये मध्ये भारतीय बाजारामध्ये इंडियन फार्मास्युटिकलचा वाटा फक्त पाच टक्के होता तर 95 टक्के औषधे आयात केली जात होती. 51 वर्षानंतर 2020 मध्ये भारतीय बाजारामध्ये भारतीय फार्मास्युटिकलचा वाटा 85 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे आणि जागतिक वाटा 15 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
गेल्या पन्नास वर्षात भारताने केवळ स्थानिक बाजारपेठेतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही आपली पकड मजबूत केली आहे. कोरोना लसीनंतर फार्मास्युटिकल उद्योगातील बदलांविषयी इंडियन ड्रग मॅन्युफॅ यचरिंग असोसिएशन (आयडीएमए) चे राष्ट्रीय अध्यक्ष महेश एच दोशी म्हणाले की, भारत जगातील दोनशे देशांना औषधे पुरवतो तर दीडशे देशांना लसी दिल्या जातात. 2019 मध्ये भारतीय लसीचे मार्केट 94 अब्ज रुपये होते जे सतत आणि वेगाने वाढत आहे. आपण युनिसेफला 60 टक्क्यांपेक्षा जास्त लस पुरवतो. हैदराबादमध्ये तीन कंपन्या कोरोना लस विकसित करीत आहेत. पुणे, हैदराबादला व्हॅकसिन सिटी म्हणतात, हा उद्योग 18 टक्के वाढीचा आहे. ही लस 100 हून अधिक देशांमध्ये पाठविली जात आहे. हैदराबादमध्ये दरवर्षी लसचेसहा अब्ज डोस तयार केलेजातात. ग्नोम व्हॅलीमध्येकृषी-बायोटेक, यिलनिकल रिसर्च मॅनेजमेन्ट, बायोफार्मा, लस उत्पादन, नियामक व चाचणी करणार्या 200 हून अधिक कंपन्या आहेत, म्हणूनच याला लाइफ सायन्स यलस्टर म्हटलेजाते.