दुबईत तयार झाली जगातली महागडी बिर्यानी
दुबई /दि. २६ – बिर्यानी हा अनेकांचा आवडता पदार्थ. बिर्यानीचेअनेक प्रकार आहेत. मांसाहाराचेचाहते तर चिकन बिर्यानीवर अक्षरश: ताव मारतात. बिर्यानीची किंमत सामान्यांच्या आवाक्यातलीच असते. मात्र एक प्लेट बिर्यानीसाठी तुम्हाला 20 हजार रुपये खर्चावे लागले तर…दुबईमधल्या एका रेस्टॉरंटने जगातली सर्वात महागडी बिर्यानी सादर केली असून ‘बॉम्बे बरो’ असं या रेस्टॉरंटचं नाव आहे. ‘रॉयल गोल्ड बिर्यानी’ या नावानेओळखल्या जाणार्या या पदार्थाची किंमत 20 हजार रुपये आहे. रॉयल गोल्ड ही दुबईमधली सर्वात चविष्ट बिर्यानी असल्याचा रेस्टॉरंटचा दावा आहे. या बिर्यानीवर 23 कॅरट सोन्याचा वर्खचढवला जातो. या वर्खामुळेच बिर्यानीला एक वेगळीच चव येते. बिर्यानी बनवण्यासाठी कोणत्या तांदळाचा वापर करायचा याची निवडही ग्राहक करू शकतात. यामुळे आपल्या आवडीचा तांदूळ निवडून बिर्यानीची लज्जत अनुभवता येते. एक प्लेट बिर्यानी तयार करण्यासाठी तीन किलो तांदूळ वापरला जातो. बिर्यानीसोबत काश्मिरी लॅम्ब, दिल्ली चॉप्स, राजपूत चिकन कबाब, मोगलाई कोफ्ता, मलईचिकन रोस्टसारखेपदार्थदिलेजातात. तसंच बेबी पॉटॅटो, उकडलेली अंडी, पुदीना रायता, तळलेले. कांदे, काजू आणि चटणीही दिली जाते. याच कारणामुळेबिर्यानीची किंमत इतकी जास्त ठेवण्यात आली आहे. एक प्लेट बिर्यानीसाठी तीन किलो तांदूळ वापरला जात असल्यानेती बनवण्यासाठी पाऊण तासापेक्षा अधिक काळ लागतो. दुबईमध्ये सध्या याच बिर्यानीची चर्चा सुरू आहे.