वडिलांनी आणि भावांनी केली तरुणाची हत्या
बंगळूर/दि.१७ – दुसरया जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून एका तरुणीची तिच्या वडिलांनी आणि दोन चुलत भावांनी मिळून हत्या केली. बंगळूरपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या रामगनाग्रा जिल्ह्यात ऑनर किqलगचे हे प्रकरण समोर आले आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सुरुवातीला तरुणी बेपत्ता असल्याची नोंद केली होती. नऊ ऑक्टोबरला मुलीच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. ती बी. कॉमच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. तक्रार नोंदवल्यानंतर दुसèया दिवशी तक्रारदाराच्या भावाच्या शेतात मुलगी मृतावस्थेत आढळली. पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी तिघांनी हत्येचे कारस्थान रचले होते. आठ ऑक्टोबरला तिघांनी मिळून मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह शेतात पुरला. दुसèया दिवशी आरोपी असलेल्या मुलीच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक सीमंत कुमार qसह यांनी दिली.