वरुड ९ – शहरातील कुख्यात गुंड अल्लु उर्फ अख्तरखान पठाण याची दहशत शहरात कायम असून वारंवार गुन्हे करणा:या अल्लुने शहरातील एका हॉटेल समोर गुंडागर्दी एका युवकाला चाकूने भोसकल्याची घटना काल (ता.८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, अल्लु उर्फ अख्तरखान पठाण व भारत कावनपुरे याचा भाऊ फंट्या हे एक जेवण करुन दुकानाबाहेर गेले व त्यांचेमध्ये वाद सुरु होता. तेव्हा भारत हा सुध्दा दुकानाबाहेर आला तर अल्लुने फंट्याला म्हटले की, मै अब तेरे को खतम ही कर देता, असे म्हणुन अल्लुने त्याचे जवळील चाकुने फंट्याचे छातीवर सपासप वार करुन त्याला गंभिर जखमी करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी भारत अशोक कावनपुरे (२४) याचे फिर्यादीवरुन वरुड पोलिसांनी अल्लु उर्फ अख्तरखान पठाण रा.आंबेडकर चौक वरुड याचे विरुध्द भादंवि ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार श्रेणिक लोढा यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.