नवी दिल्ली/दि.२७ – काँग्रेस(Congress) पक्षातील अंतर्गत कलह हळूहळू वाढत चालला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी जितीन प्रसाद यांच्या बहाण्याने पक्षाला लक्ष्य केले आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसने प्रसाद यांच्यावर केलेली टीका दुर्दैवी असल्याचे ट्वीट सिब्बल यांनी केले आहे. सिब्बल यांनी ट्विट केले, की प्रसाद यांना अधिकृतपणे लक्ष्य केले जाणे दुर्दैवी आहे. काँग्रेसने आपल्याच पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात शक्ती खर्च करण्याऐवजी भाजपवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज आहे. हे पत्र लिहिणा-या नेत्यांपैकी मनीष तिवारी यांनी सिब्बलच्या ट्विटवर ‘प्रेसिस्टियन‘ (भावी ज्ञानी) हा शब्द लिहिला. प्रसाद यांच्यासह २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष देण्याची मागणी केली होती. त्यात भाजपशी लढताना प७ कसा कमी पडतो, हे स्पष्टपणे नमूद केले होते. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे काँग्रेसच्या कार्यकत्र्यांनी प्रसाद यांचा निषेध केला. लखीमपूर खेरी जिल्हा काँग्रेस समितीने प्रसाद यांच्यावर पक्षविरोधी कारवाया करण्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप केला आणि त्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली. या बैठकीत काँग्रेस कार्यकत्र्यांनी जिल्हा व शहर अध्यक्षांच्या उपस्थितीत प्रसात मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या.